Advertisement

दादर यूनियनला प्रबोधन टी-२० स्पर्धेचे विजेतेपद


दादर यूनियनला प्रबोधन टी-२० स्पर्धेचे विजेतेपद
SHARES

प्रबोधन मुंबई टी-२० क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या दादर यूनियन संघाने बलाढ्य पय्याडे क्रिकेट क्लब संघावर १५ धावांनी विजय मिळवत विजेतेपदासह एक लाख रुपयाचे पारितोषिक पटकावले. दादर यूनियनने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २१७ धावांचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना पय्याडे संघाला २० षटकांत केवळ ९ बाद २०२ धावाच करता आल्या. या लढतीत ७७ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या दिव्यांश सक्सेनाची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून प्रबोधन संघाच्या शशांक सिंग (१८४ धावा, २ विकेट्स आणि दोन वेळा सामनावीर) याची निवड करण्यात आली. त्याला होंडा शाइन बाईक देऊन भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


दिव्यांशची तुफान फटकेबाजी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिव्यांश सक्सेनाने दादर यूनियनला भक्कम सलामी दिली. त्याने ३९ चेंडूत ७७ धावांची खेळी साकरणाली. त्यानंतर कर्णधार साईराज पाटीलने (३६ धावा) यशस्वी जैस्वालच्या (१८) साथीने चौथ्या विकेटसाठी ५७ धावा जोडल्या. त्यामुळे दादर युनियनने २० षटकांत ७ बाद २१७ धावांचा पल्ला गाठला.


खिझार दाफेदारची कमाल

विजयी धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हर्ष टंक (३९) आणि प्रफुल्ल वाघेला (२४) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागी रचत पय्याडेला अाश्वासक सुरुवात करून दिली. त्यानंतर पराग खानापूरकर (२०) आणि गौरव जठार (४२) यांनी डाव सावरला. खिझार दाफेदार याने ३ बळी मिळवत कमाल केली. अक्षय दरेकर, दिनेश साळुंखे आणि यशस्वी जैस्वाल यांनी टिपलेले झेल सामन्याला कलाटणी देणारे ठरले.


हेही वाचा - 

शिवाजी पार्क जिमखान्याची दादर यूनियनवर सरशी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा