Advertisement

दिव्यांगांच्या राष्ट्रीय क्रिकेटचा थरार पोलीस जिमखान्यावर


दिव्यांगांच्या राष्ट्रीय क्रिकेटचा थरार पोलीस जिमखान्यावर
SHARES

जगण्यासाठी संघर्ष करत असलेल्या दिव्यांगांमध्ये जगण्याची, खेळण्याची नवी उमेद निर्माण करण्यासाठी अाठव्या एलअायसी चषक अांतरविभागीय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा अायोजित करण्यात अाली अाहे. दिव्यांगांच्या क्रिकेटचा थरार शुक्रवारपासून मुंबईच्या पोलीस जिमखान्यावर रंगणार अाहे. पाच विभागीय संघाचा सहभाग असलेल्या या तीनदिवसीय स्पर्धेत दक्षिण विभाग आणि पूर्व विभाग यांच्यातील लढतीनं दिव्यांगांच्या फटकेबाजीला सुरुवात होईल.


अंतिम सामना १ एप्रिलला

अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील दिव्यांगाना आपल्या क्रिकेटचं कौशल्य दाखविता येईल. देशभरात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे पाच विभागीय संघ बनविण्यात आले आहेत. या स्पर्धेत एकंदर दहा साखळी सामने खेळविले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना १ एप्रिलला नॅशनल क्रिकेट क्लबच्या मैदानावर रंगेल. दिनेश सैनी, दशरथ जामखंडी, सौरभ रवालिया आणि बलविंदर सिंगसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार अाहेत.


दिव्यांगांसाठी अनेकांचा पुढाकार

दिव्यांग क्रिकेटपटूंची राष्ट्रीय स्पर्धा दिमाखदार व्हावी म्हणून एलआयसीने मुख्य पुरस्कर्ते म्हणून पुढाकार घेतला असून न्यू इंडिया ऍश्युरन्स, इंडियन ऑईल, जीआयसी, एचडीएफसी, युनियन बँक आणि सेंट्रल बँक यांचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेचे आयोजन पोलीस जिमखान्याच्या दर्जेदार मैदानासह नॅशनल क्रिकेट क्लब आणि कर्नाटक स्पोर्टिंगच्या मैदानावरही केले जाणार आहे. उद्घाटन सोहळा शुक्रवारी सकाळी ९ वाजता दिव्यांग क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ आणि माजी कर्णधार अजित वाडेकर, न्यू इंडिया ऍश्युरन्सचे महाव्यवस्थापक एस. शंकर, जीआयसी रे च्या अध्यक्ष ऍलिस वैद्यन यांच्या उपस्थितीत पार पडेल.


हेही वाचा -

अांतरविभागीय राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा ३० मार्चपासून

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा