Advertisement

डी. वाय पाटील स्पोर्टस क्लबची विजयी सलामी


डी. वाय पाटील स्पोर्टस क्लबची विजयी सलामी
SHARES

योगेश ताकवले (६५ धावा) आणि शुभम रांजणे (नाबाद ५१ धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर डॉ. डी. वाय पाटील स्पोर्टस असोसिएशनने पार्कोफिन क्रिकेट क्लबचा सहा विकेट्स राखून पराभव करत विख्यात क्रिकेटपटू विजय मांजरेकर व रमाकांत देसाई स्मृती चषक एसपीजी-एलआयसी  टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. त्याअाधी माजी कसोटीपटू रमेश पोवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी कसोटीपटू व शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण आमरे, चेअरमन अविनाश कामत,  जनरल सेक्रेटरी संजीव खानोलकर, असिस्टंट जनरल सेक्रेटरी सुनील रामचंद्रन आदी मंडळी उपस्थित होती.



अंशुल गुप्ताची अाक्रमक फलंदाजी

डॉ. डी. वाय पाटील स्पोर्टस क्लबने नाणेफेक जिंकून पार्कोफिन क्रिकेटर्सला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. सलामीवीर अंशुल गुप्ताने (६९ धावा) आक्रमक फलंदाजी करीत तन्मय मिश्रासह (३२ धावा) ५९ धावांची सलामी भागीदारी रचली.  त्यानंतर मात्र प्रशांत भोईर (३३ धावांत २ बळी) व कर्ष कोठारी (३८ धावांत २ बळी) यांनी सुंदर गोलंदाजी करून पार्कोफिन क्रिकेटर्सची अवस्था ४ बाद ९५ धावा अशी केली. अंशुल अाणि सिदक सिंग (४० धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची बहुमोल भागीदारी केली. त्यामुळे अखेर २० षटकांत पार्कोफिन क्रिकेटर्स संघाने ७ बाद १८१ धावांचा पल्ला गाठला.



ताकवले-रांजणेची शतकी भागी

विजयी लक्ष्य गाठण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेली डॉ.डी.वाय पाटील स्पोर्टसची सलामीची जोडी लवकरच माघारी परतली. जे. पी. यादव, योगेश सावंत व निशाण सिंग यांनी उत्तम गोलंदाजी करून डी. वाय पाटीलला अाठव्या षटकांत ३ बाद ६६ धावसंख्येवर रोखले होते. परंतु त्यानंतर मात्र  योगेश ताकवले आणि शुभम रांजणे या जोडीने चौथ्या विकेटसाठी १०३ धावांची झंझावाती भागीदारी केली आणि डॉ. डी.वाय पाटील स्पोर्टसचा दुसऱ्या फेरीसाठीचा मार्ग सुकर केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा