Advertisement

टी-२० वर्ल्डकपसाठी 'इतके' खेळाडू निवडता येणार

टी-२० वर्ल्डकप संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (आयसीसी) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

टी-२० वर्ल्डकपसाठी 'इतके' खेळाडू निवडता येणार
SHARES

टी-२० वर्ल्डकप संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (आयसीसी) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी प्रत्येक संघ जास्ती जास्त २३ खेळाडूसह प्रवास करू शकतो. कोरोना व्हायरसमुळं आयसीसीनं हा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या स्पर्धांसाठी आतापर्यंत फक्त १५ खेळाडू निवडण्याची अथवा त्यांच्या सोबत प्रवास करण्याची परवानगी होती. या सोबत सपोर्ट स्टाफसह ३० जणांना प्रवास करण्याची परवानगी होती. पण करोना व्हायरसचा विचार करता काही नियमात बदल करण्यात आले आहेत.

आयसीसीनं मोठ्या स्पर्धेसाठी २३ खेळाडूंना निवडण्याची परवानगी दिली आहे. यातूनच अंतिम ११ जणांचा संघ निवडता येणार आहे. कोरोना व्हायरसमुळं आयसीसीनं हा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्याचा बदली खेळाडू मिळणार नाही. कारण याआधी बदली खेळाडू एका दिवसात मिळायचा. तेव्हा कोरोनाची समस्या नव्हती. पण आता खेळाडूंना बायो बबलमध्ये प्रवेश करण्यासाठी क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करावा लागतो आणि त्यानंतर संघात स्थान मिळते.

या अडचणीचा विचार करूनच आयसीसीने २३ खेळाडूंना सोबत घेण्याची परवानगी दिली आहे. पण या २३ पैकी कोणत्या १५ खेळाडूंना अंतिम संघात स्थान मिळेल आणि बाकीच्या खेळाडूंना रिझर्व्ह म्हणून असतील की सर्वच खेळाडू बेंच स्ट्रेंथचा भाग असतील किंवा अंतिम अकरा सोडून बाकी सर्वांना फिल्डिंग करता येईल याबाबत आयसीसीनं स्पष्टीकरण दिलं नाही.



हेही वाचा -

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी रिषभ पंत

कोरोनाग्रस्त सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा