Advertisement

अजित वाडेकरांना दिग्गज क्रिकेटपटूंसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली


अजित वाडेकरांना दिग्गज क्रिकेटपटूंसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
SHARES

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर हा भारतीय क्रिकेटमधील एक हिरा बुधवारी रात्री निखळला. जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं १९७१मध्ये वेस्ट इंडिज अाणि इंग्लंड दौऱ्यात एेतिहासिक असा मालिका विजय भारताला मिळवून दिला होता. अजित वाडेकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, संजय मांजकेकर, वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे या दिग्गज क्रिकेटपटूंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली अाहे.


मोलाचे सल्ले दिले- सचिन

अजित वाडेकर यांच्या निधनाची बातमी एेकून अतीव दु:ख झाले. ९०च्या दशकात माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी मला मौल्यवान सल्ले दिले. त्यांनी अनेक वेळा मला मार्गदर्शनही केले. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. वाडेकर सरांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना हा अाघात सहन करण्याचे बळ देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेन, अशा शब्दांत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं वाडेकरांना श्रद्धांजली वाहिली.



प्रशिक्षक म्हणून कडक शिस्तीचे - मांजरेकर

अजित वाडेकर यांचे भारतीय क्रिकेटमधील योगदान प्रचंड होते. त्यांच्या समकालीन क्रिकेटपटूंनी त्यांना देव मानले होते. त्यांचा रुबाब, व्यक्तिमत्व वाखाणण्याजोगे होते. प्रशिक्षक म्हणूनही ते कडक शिस्तीचे होते. या अद्वितीय क्रिकेटपटूला श्रद्धांजली, असे ट्विट करत संजय मांजरेकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


भारतीय क्रिकेटचा वटवृक्ष – कुंबळे

अजित वाडेकर यांच्या रूपाने एक महान क्रिकेटपटू अापण गमावला अाहे. संपूर्ण संघासाठी एका प्रशिक्षकापेक्षाही मोठे होते. भारतीय क्रिकेटचा ते वटवृक्ष होते. तसेच ते एक पितृतुल्य व्यक्तिमत्व अाणि एक हुशार, चाणाक्ष कर्णधार होते. त्यांची उणीव नक्कीच जाणवेल. माझ्या क्षमतेवर विश्वास दाखविल्याबद्दल मी तुमचा ऋणी अाहे, असे ट्विट भारताचा माजी कर्णधार अाणि लेगस्पिनर अनिल कुंबळेनं केलं अाहे.


हेही वाचा -

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

अवघे पाऊणशे वयमान... अजित वाडेकर, माधव अापटे यांनी जिंकली मने




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा