Coronavirus cases in Maharashtra: 668Mumbai: 377Pune: 65Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Navi Mumbai: 22Nagpur: 17Ahmednagar: 17Pimpri Chinchwad: 16Thane: 15Panvel: 11Latur: 8Vasai-Virar: 6Buldhana: 5Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Nashik: 1Washim: 1Amaravati: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 32Total Discharged: 52BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Coronavirus: कोरोनावर मात करण्यासाठी सचिनचा चाहत्यांना संदेश

भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने कोरोना व्हायरसच्या जनजागृतीसाठी सचिन तेंडुलकरनं महत्वाचं पाऊल उचललं आहे.

Coronavirus: कोरोनावर मात करण्यासाठी सचिनचा चाहत्यांना संदेश
SHARE

कोरोना व्हायरसमुळं सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. देशासह जगभरातील नागरिक खबरदारी घेत आहेत. सध्यस्थितीत भारतातील मुंबई, दिल्ली, बंगळुरु यांसारख्या महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळं महाराष्ट्र सरकार प्रत्येक पातळीवर लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहे. अशातच, भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनं त्याच्या चाहत्यांना कोरोनावर मात कशी करायची याबाबत संदेश दिला आहे.देशातील सरकारी यंत्रणा या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सचिन तेंडुलकरनंही World Health Organization आणि UNISEF च्या माध्यमातून ‪#SafeHandsChallenge नावानं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये सध्याच्या परिस्थितीत स्वच्छता राखण्यासाठी आपण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, याबद्दल सचिननं मार्गदर्शन केलं आहे.

देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं शंभरी पार केली असून महाराष्ट्रात एका रुग्णाला करोनामुळे आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळं येत्या काळात सरकारी यंत्रणा करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

Coronavirus Updates: टोल नाक्यावर ड्रायव्हर, प्रवाशांची नॉर्मल स्क्रिनींग

Coronavirus Updates: सर्वांसाठी पाणी उपलब्ध करण्याची पाणी हक्क समितीची मागणीसंबंधित विषय
संबंधित बातम्या