Advertisement

#MeToo: जोहरी यांना निलंबित करा, ७ राज्यातील क्रिकेट मंडळांची मागणी

लैंगिक अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी 'सीओए'ने जोहरी यांना कारणे द्या नोटीस पाठवली होती. या नोटीशीचं उत्तर जोहरी यांनी दिल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच जोहरी यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी 'सीओए'ने ३ सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे.

#MeToo: जोहरी यांना निलंबित करा, ७ राज्यातील क्रिकेट मंडळांची मागणी
SHARES

लैंगिक अत्याचाराचा आरोप झेलत असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)चे सीईओ राहुल जोहरी यांना त्वरीत निलंबित करण्यात यावं, अशी मागणी ७ राज्यातील क्रिकेट संस्थांनी 'बीसीसीआय'कडे केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ७ राज्यांच्या क्रिकेट संस्थांमध्ये सौराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा या संस्थांचा समावेश आहे. या संस्थांनी प्रशासक समिती (सीओए)ला पत्र लिहून सीईओ राहुल जोहरी यांची चौकशी सुरू असेपर्यंत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. यावर आता 'सीओए' प्रमुख विनोद राय यांना निर्णय घ्यायचा आहे. जोहरी २०१६ पासून बीसीसीआयचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत.


चौकशी समितीची नियुक्ती

त्यानंतर 'सीओए'ने जोहरी यांना कारणे द्या नोटीस पाठवली होती. या नोटीशीचं उत्तर जोहरी यांनी दिल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच जोहरी यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी 'सीओए'ने ३ सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. यामध्ये इलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राकेश शर्मा, दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा बरखा सिंह आणि सीबीआयचे माजी संचालक पी.सी. शर्मा यांचा समावेश आहे. या समितीला आपला अहवाल १५ दिवसांच्या आत सोपवायचा आहे.


काय आहे प्रकरण?

एका महिला पत्रकाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. जोहरी डिस्कव्हरी नेटवर्क एशिया पॅसिफिकचे एक्झिक्युटीव्ह व्हाइस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर (साऊथ एशिया) असताना नोकरी मागण्यास गेलेल्या पीडित महिलेला त्यांनी आपल्या घरी नेलं आणि तिथं लैंगिक अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप आहे.

अडचणी वाढल्या

दरम्यान मुंबईचे माजी रणजी खेळाडू शिशीर हट्टंगडी (५७) यांनी देखील जोहरी यांच्यावर आरोप केल्याने जोहरी यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. पीडित महिलेने आपल्याकडे जोहरी यांची तक्रार केली होती. मी त्या महिलेला ही तक्रार लिखित स्वरूपात करण्यास सांगितल्यावर तिने माझ्याकडे लिखित तक्रार दिली होती. यासंदर्भात आपण कुठल्याही समितीपुढे किंवा न्यायालयापुढे साक्ष देण्यास तयार आहोत, असंही ते म्हणाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा