ऋषी कपूर यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती- पूनमचे वडील

Mumbai
ऋषी कपूर यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती- पूनमचे वडील
ऋषी कपूर यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती- पूनमचे वडील
See all
मुंबई  -  

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात विजय मिळवू न शकलेल्या महिला खेळाडूंच्या कामगिरीबद्दल सर्वसामान्य भारतीय क्रीडाप्रेमी बेहद खुश आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक महिला क्रिकेटपटूंनी त्यांच्यातल्या लढाऊ वृत्तीचे प्रात्यक्षिक दाखवले. या सामन्यापूर्वी ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांनी केलेल्या वादग्रस्त  ट्विटमुळे महिला क्रिकेटपटूंमध्ये नाराजी आहे. पूनम राऊत या क्रिकेटपटूच्या वडिलांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. 

काय केलं ऋषी कपूर यांनी?

महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी ऋषी कपूर यांनी ट्विट केलं होतं. 


ऋषी कपूर यांनी केलेल्या ट्विटबद्दल पूनमच्या वडिलांना कळलं तेव्हा ते स्वतःची नाराजी लपवू शकले नाहीत. 


ऋषी कपूर यांनी जे म्हटले आहे ते खुप अयोग्य आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्याने असं बोलणं दुर्दैवी आहे. त्यांनी स्वतःचा आब राखायला हवा होता. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. 

गणेश राऊत

पूनम राऊतचे वडीलमुलीमुळे मान उंचावली

पूनम राऊत ही याच क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करून दाखवणारी गुणी खेळाडू. मुंबईकर पूनमच्या स्पर्धेतल्या कामगिरीमुळे तिचं सर्वत्र कौतुक होतंय. मुलीच्या कौतुकाने तिचे वडील, गणेश राऊत साहजिकच सुखावले आहेत. पण... हा पणच त्यांना अस्वस्थ करतोय. मुलीच्या दमदार कामगिरीला भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अंतिम विजेतेपदावर मोहर लागली असती तर आनंद द्विगुणीत झाला असता, अशी प्रतिक्रिया गणेश राऊत यांनी मुंबई लाइव्ह शी बोलताना व्यक्त केली आहे. पण त्यानंतर स्वतःला दिलासा देत स्पर्धेत हार-जीत सुरूच राहते, अशी समजूतदार भूमिकाही त्यांनी बोलून दाखवली. स्वतःची मुलगी पूनमसोबतच तिच्या संघातल्या सहकारी मिताली राज, पूनम यादव, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा यांच्या कामगिरीचे कौतुक करायलाही ते विसरले नाहीत. 

गणेश राऊत यांनी हा मुद्दा इथंच सोडून द्यायचं ठरवलं आहे. आपल्या मुलीने आता क्रीडाक्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करावं, एवढीच इच्छा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आपल्याला गरीब परिस्थितीमुळे आपल्याला आवड असूनही क्रिकेटमध्ये करियर करता आलं नाही. आपली मुलीने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी मुंबई लाइव्ह शी बोलताना व्यक्त केली आहे. मुलीच्या पालकांनी त्यांच्या मुलीमधले कलागुण हेरावेत आणि त्यांना हवं तिथेच करियर करु द्यावं, असा सल्लाही त्यांनी मुलींच्या पालकांना दिला आहे. 


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.