Advertisement

आयसीसीकडून दशकातील सर्वश्रेष्ठ टी २०, वन डे संघाची घोषणा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसीने) दशकातील सर्वश्रेष्ठ टी २० आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे.

आयसीसीकडून दशकातील सर्वश्रेष्ठ टी २०, वन डे संघाची घोषणा
SHARES

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसीने) दशकातील सर्वश्रेष्ठ टी २० आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. टी २० संघात टीम इंडियाच्या ४ खेळाडू्ंना  स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, महेंद्र सिंह धोनीचा समावेश आहे. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी धोनीकडं देण्यात आली आहे.

टी २० संघात संघात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी २ खेळाडूंना दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी  खेळाडूला संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंच आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल, वेस्ट इंडिजच्या ‘युनिव्हर्सल बॉल’ ख्रिस गेल आणि ऑलराऊंडर कायरन पोलार्ड, तसेच श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा, आफ्रिकेच्या एबी डी व्हीलियर्स आणि अफगाणिस्तानच्या राशिद खानचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट टी २० टीम  

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, ख्रिस गेल, अॅरॉन फिंच, विराट कोहली, एबी डी व्हीलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा.

सर्वोत्तम वनडे टीम

रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हीलिअर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इम्रान ताहिर आणि लसिथ मलिंगा.हेही वाचा -

आयपीएलमध्ये आता १० संघ खेळणार

महाराष्ट्रात होणार पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा