Advertisement

आयपीएलमध्ये आता १० संघ खेळणार

२०२२ च्या हंगामात आयपीएलचे दहा संघ असतील. दोन संघ वाढल्याने सामन्यांची संख्याही वाढणार आहे. नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

आयपीएलमध्ये आता १० संघ खेळणार
SHARES

आयपीएल मध्ये  आता १० संघ खेळणार आहेत. नवीन दोन संघांचा समावेश करण्यास गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.  सध्या आयपीएलमध्ये ८ संघ आहेत

२०२२ च्या हंगामात आयपीएलचे  दहा संघ असतील. दोन संघ वाढल्याने सामन्यांची संख्याही वाढणार आहे. नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. आयपीएल २०२१ नंतर नव्या दोन संघाबाबत लिलाव प्रक्रिया सुरु होणार आहे. या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित आहेत.


या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली.  याशिवाय प्रथम श्रेणीच्या सर्व खेळाडूंना (महिला आणि पुरुष ) कोरोना महामारीमुळे सामने न होऊ शकल्यामुळे योग्य तो मोबदला देण्यावरही एकमत झालं आहे. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही या सभेमध्ये निर्णय झाला.


१० संघांचा समावेश झाल्यास अडीच महिन्यांच्या कालावधीत ९४ सामने खेळवताना आंतरराष्ट्रीय वेळापत्रक बिघडण्याची भीती आहे. त्याचबरोबर परदेशी खेळाडूंची उपलब्धता हाही कळीचा मुद्दा आहे. त्याचबरोबर प्रसारणकर्ते प्रत्येक वर्षी ६० सामन्यांसाठी पैसे मोजत असतात. स्टार इंडियाने २०१८-२०२२ या कालावधीसाठी प्रत्येक ६० सामन्यांच्या मोसमाकरिता १६३४७ कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे सामन्यांची संख्या वाढल्यास, त्यांच्याशी नव्या कराराबद्दल बोलणी करावी लागेल. त्यामुळे यंदा आयपीएलमध्ये आठ संघ असतील. 



हेही वाचा -

मुंबईत आलेल्या 'त्या' प्रवाशांसाठी वॉर्ड वॉर रूम

मुंबई लोकलच्या दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा