Advertisement

माहिम : बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये पोहोचली 'ICC क्रिकेट वर्ल्ड कप' ट्रॉफी, पहा पहिली झलक

ICC क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी प्रदर्शित करण्याची संधी मिळालेली मुंबईतील एकमेव शाळा

माहिम : बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये पोहोचली 'ICC क्रिकेट वर्ल्ड कप' ट्रॉफी, पहा पहिली झलक
SHARES

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक 2023 वेळापत्रक जाहीर केले आहे. आगामी विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. त्याच वेळी, विश्वचषकापूर्वी, आयसीसी विश्वचषक 2023 ट्रॉफीच्या प्रचारासाठी ट्रॉफी टूर आयोजित करण्यात आली आहे. ही ट्रॉफी कोलकाता ते लेहपर्यंत जाणार असली तरी आता ट्रॉफी मुंबईत पोहोचली आहे. वास्तविक, मंगळवारी म्हणजेच आज ट्रॉफी मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये पोहोचली आहे.

बॉम्बे स्कॉटिश प्रिन्सिपल सुनीता जॉर्ज यांनी Mumbai Liveला सांगितले की, “ट्रॉफी टूर'चा हा एक भाग आहे. ही ट्रॉफी कोलकाताहून लेहला गेली जिथून ती मुंबईत आली. ट्रॉफी होस्ट करण्याची ही दुर्मिळ संधी मिळालेली आम्ही मुंबईतील एकमेव शाळा आहोत. यामुळे मुलांना त्यांच्या भविष्यासाठी ही ट्रॉफी पाहण्याची प्रेरणा मिळेल आणि शाळेसाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. त्याचबरोबर सुमारे 20 शाळांचे क्रिकेट संघही या खास दिवशी पाहायला मिळाले."

गेल्या महिन्यात मुंबईत एका भव्य कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2023 मध्ये ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा 13वा मोसम भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. 5 ऑक्‍टोबर ते 19 नोव्‍हेंबर या कालावधीत विविध 10 ठिकाणी खेळले जाणार आहेत. एकीकडे एकदिवसीय विश्वचषकाबाबत जगभरात उत्साह पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे भारतातील विविध शहरांमध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.



हेही वाचा

क्रिकेटर पृथ्वी शॉ-सपना गिल प्रकरणात मोठा खुलासा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा