Advertisement

क्रिकेट वर्ल्डकप जिंकणारी टीम होणार मालामाल, मिळणार ४० लाख डाॅलरचं बक्षीस

येत्या ३० मे पासून इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषकाला सुरूवात होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला चषकासह तब्बल ४० लाख डाॅलरचं बक्षीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (ICC)कडून देण्यात येईल.

क्रिकेट वर्ल्डकप जिंकणारी टीम होणार मालामाल, मिळणार ४० लाख डाॅलरचं बक्षीस
SHARES

येत्या ३० मे पासून इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषकाला सुरूवात होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला चषकासह तब्बल ४० लाख डाॅलरचं बक्षीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (ICC)कडून देण्यात येईल. बक्षीसाची ही रक्कम विश्वचषकाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम आहे. 

साखळीतील विजेत्यालाही बक्षीस

तर, उपविजेत्या संघाला २० लाख डाॅलरचं बक्षीस मिळेल. या स्पर्धेत एकूण १० संघ एकमेकांशी मुकाबला करणार आहेत. उपविजेत्या संघासह उपांत्य सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला ८ लाख डाॅलर, साखळी सामन्यातून पुढील फेरीत जाणाऱ्या संघाला १ लाख डाॅलर, तर साखळी सामन्यातील प्रत्येक विजेत्या संघाला ४० हजार डाॅलरचं बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेत एकूण १ कोटी डाॅलरपर्यंतच्या रकमेची बक्षीसं वाटली जाणार आहेत.

या स्पर्धेत कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यांचा भारतीय संघ सहभागी होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार आहे. भारतीय संघाला विश्वचषकासाठी फेव्हरेट मानलं जात असून विश्वचषक भारतात आणण्यासाठी संघात बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.    



हेही वाचा-

मुंबईच्या विजयानंतर नीता अंबानी यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन



 
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा