Advertisement

मुंबईच्या विजयानंतर नीता अंबानी यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

नीता अंबानी यांनी मुंबई आयपीएल ट्रॉफीसह सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेश पूजा केली. या पूजेचा व्हिडिओ मुंबई इंडियन्स संघाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

मुंबईच्या विजयानंतर नीता अंबानी यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) १२ व्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स संघानं आयपीएलचं चाैथं विजेतेपद पटकावलं. या विजयानंतर ओपन बसमधून मुंबई इंडियन्सची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी यांचं घर अँटिलिया ते ट्रायडंट हॉटेलपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नीता अंबानी यांनी मुंबई आयपीएल ट्रॉफीसह सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेश पूजा केली.

राधा कृष्ण मंदिरात दर्शन

नीता अंबानी यांनी जुहूच्या राधा कृष्ण मंदिरात जाऊनही दर्शन घेतलं. या मंदिरात त्यांनी राधा कृष्णच्या मूर्तीसह आयपीएलच्या ट्रॉफीची देखील पूजा केली. या पूजेचा व्हिडिओ मुंबई इंडियन्स संघाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये नीता अंबानी एकट्या ट्रॉफी उचलून मंदिरातील श्रीकृष्णच्या मूर्तीच्या पुढ्यात ठेवताना दिसत आहेत.

चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद

आयपीएलच्या १२ व्या सीझनच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या सामन्यात मुंबईनं चेन्नईला एका धावेने पराभूत करत चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावलं.


हेही वाचा -

पालिकेच्या इंजिनिअर्सचा एकत्र रजेवर जाण्याचा निर्णय रद्द

मुंबई- पुणे महामार्गावर ७ दिवस १५-१५ मिनिटांचा विशेष ब्लॉकRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement