Advertisement

पाकिस्तानच्या पराभवासाठी भारतीय महिला संघ सज्ज


पाकिस्तानच्या पराभवासाठी भारतीय महिला संघ सज्ज
SHARES

महिला टी-२ विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रेकट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं ५१ चेंडूत १०३ धावा फटकवून ३४ धावांनी न्यूझीलंडचा पराभव केला होता. दरम्यान, विश्वचषाकतील दुसरा सामना रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे.


भारताची दमदार कामगिरी

टी-२० क्रमवारीत भारताला जागतिक दर्जा दिला जात नसला तरी न्यूझीलंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारतानं दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारताला विजयाचे दावेदार मानले जात आहे. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार? याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे.


कुणाला मिळणार संधी?

पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मानसी जोशी किंवा पूजा वस्त्रकार यांच्यापैकी एका वेगवान गोलंदाजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तान संघात कर्णधार जावेरिया खान, अनुभवी फिरकीपटू सना मीर आणि अष्टपैलू बिसमाह मारुफ हे दर्जेदार खेळाडू आहेत. मात्र पाकिस्तान संघाला आॅस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

प्रोव्हिडेन्स स्टेडियमची खेळपट्टी धिम्या गतीच्या गोलंदाजांसाठी उपयुक्त मानली जात असल्यामुळे भारताने दीप्ती शर्मा, दयालन हेमलता, पूनम यादव आणि फिरकीपटू राधा यादव यांना संधी दिली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा