Advertisement

पोयसर जिमखान्यात घ्या पूनम राऊतकडून क्रिकेटचे धडे!


पोयसर जिमखान्यात घ्या पूनम राऊतकडून क्रिकेटचे धडे!
SHARES

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू पूनम राऊतच्या स्पोर्ट्स अकादमीचे शनिवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले. कांदिवलीतील पोयसर जिमखाना येथे 'पूनम राऊत स्पोर्टस् अकादमी' सुरू करण्यात आली असून या अकादमीत उदयोन्मुख महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  

उद्घाटनप्रसंग् पूनम राऊत, भारतीय संघातील हरमनप्रीत कौर, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन इ. उपस्थित होते. 



राज्यभरातून एकूण २०० पेक्षा अधिक मुलींनी या अकादमीत प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केले होते. पण यातून सर्वोत्कृष्ट ४० खेळाडूंचीच प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.

भविष्यात उत्कृष्ट महिला खेळाडू घडावे म्हणून ही अकदमी सुरू करण्यात आल्याची प्रतिक्रिया पूनमने यावेळी दिली. अकादमीत प्रवेश घेतलेल्या मुलींना क्रिकेटचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाईल, असेही ती म्हणाली.



मी जेव्हा खेळत होते, तेव्हा अशी अकादमी नव्हती. पण या अकादमीच्या निमित्ताने तरूण खेळाडूंना नवे व्यासपीठ मिळाले आहे. या सर्व प्रशिक्षणार्थींनी पूनमला कर्णधार मानूत जीवतोड मेहनत करावी, असे हरमनप्रीत म्हणाली.


माझ्या अकादमीचं उद्घाटन होत असल्याचा मला खूप आनंद वाटत आहे. सुरुवातीला मी मुलांसोबत क्रिकेट खेळायचे. कारण फक्त मुलींसाठी कुठेही क्रिकेट अकादमी नव्हती. प्रशिक्षणासाठी मला बोरिवलीहून माटुंग्याला जावे लागायचे. तेव्हा उपनगरातल्या या अकादमीच्या माध्यमातून महिला क्रिकेट खेळाडूंनी मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर नाव कमवावे, अशी माझी इच्छा आहे.
- पूनम राऊत, भारतीय महिला क्रिकेट खेळाडू


हेही वाचा - 

पूनम राऊतच्या प्रमुख उपस्थितीत रंगणार दहीहंडीचा थरार



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा