Advertisement

पूनम राऊतच्या प्रमुख उपस्थितीत रंगणार दहीहंडीचा थरार


SHARES

'अरे बोल बजरंग बली की जय' म्हणत मुंबईमध्ये 15 ऑगस्टला मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. मुंबईच्या विविध भागात दहीहंडीचे थर लागताना दिसतील. असाच दहीहंडीचा उत्साह बोरीवलीच्या एमएचबी कॉलनीमध्ये देखील पहायला मिळणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग हितवर्धक मंडळातर्फे बोरीवलीच्या एमएचबी कॉलनीमध्ये देखील गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी आयोजित केली जाते. यंदा या दहीहंडीचे खास आकर्षण असणार आहे महिला विश्वचषक क्रिकेट संघातील खेळाडू आणि बोरिवलीकर पूनम राऊत!

संबंधित विषय
Advertisement