Advertisement

सूर्यकुमार यादव आऊट? नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा!

सुर्यकुमार खरच आऊट होता का? ही चर्चा सर्व क्रिकेटप्रेमींसह नेटीझन्समध्ये रंगली आहे.

सूर्यकुमार यादव आऊट? नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा!
SHARES

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यामध्ये टीम इंडियानं पाहुण्यांसमोर विजयासाठी १८६ धावांचं मोठं आव्हान ठेवलं. यामध्ये भारताचा मधल्या फळीचा फलंदाज सूर्यकुमार यादवनं पदार्पणाच्या सामन्यातच दमदार अर्धशतकी खेळी केली. पण अर्धशतकानंतर सुर्यकुमार झेलबाद झाला. मात्र, यावेळी सुर्यकुमार खरच आऊट होता का? ही चर्चा सर्व क्रिकेटप्रेमींसह नेटीझन्समध्ये रंगली आहे.

थर्ड अंपायरनी दिलेला हा निर्णय कुणालाच न पटल्यानं त्यांनी त्या निर्णयला ट्रोल करण्यास सुरूवात केली. मैदानाबाहेर बसलेल्या टीम इंडियासोबतच आपापल्या घरी ट्वीटरवर बसलेल्या नेटिझन्सना देखील पटला नाही. त्यावरूनच ट्वीटवर #notout #umpiring #thirdumpire असे ट्वीटर ट्रेंड दिसू लागले आहेत.

नेमकं झालं काय?

झंझावाती अर्धशतक पूर्ण करणारा सूर्यकुमार यादव भारताचा स्कोअरबोर्ड वेगाने पुढे घेऊन जाईल, असं वाटत असतानाच सॅम करनच्या गोलंदाजीवर वैयक्तिक ५७ धावांवर असताना सूर्यकुमार यादवचा अप्रतिम झेल डेविड मलाननं पकडला. मात्र, यावेळी मलानच्या हातातून चेंडू मैदानाला लागल्याचं मोठ्या स्क्रीनवर दिसत होतं.

मात्र, नेमक्या त्याच वेळी मलानची बोटं चेंडूच्या खाली होती की नाही, यावर थर्ड अंपायर देखील खात्रीशीर निर्णयाप्रत येऊ शकले नाहीत. पण मैदानावरील अंपायरने बाद दिल्यामुळे थर्ड अंपायरने देखील सूर्यकुमार यादवला बाद दिलं. एका ट्वीटर युजरने याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या निर्णयावर नेटिझन्ससोबतच अनेक आजी-माजी खेळाडूंनी ट्वीटरवरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागनं तर थर्ड अंपायरवरच एक मीम पोस्ट केलं आहे!



हेही वाचा -

राज्यात १२,५०० पोलिसांची भरती करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

वाढत्या कोरोनामुळं दादरच्या बाजाराचे पुन्हा स्थलांतर?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा