Advertisement

ऐतहासिक कसोटीसाठी भारत सज्ज


ऐतहासिक कसोटीसाठी भारत सज्ज
SHARES

कानपूर - गुरुवारपासून न्यूझीलंडविरुद्ध होणारा पहिला कसोटी सामना भारताचा 500 वा कसोटी सामना आहे. त्यामुळे गुरुवारचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. अशा ऐतिहासिक प्रसंगी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्या कामगिरीवर मुंबईकरांच्या नजरा असतील. कानपूरच्या ऐतिहासिक ग्रीनपार्क मैदानावर होणाऱ्या या सामन्याच्या जंगी आयोजनासाठी बीसीसीआयने जय्यत तयारी केली आहे. याप्रसंगी भारताचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांचा सत्कार करण्यात येणार आहे. मात्र या ऐतिहासिक सामन्यावर पावसाचे संकट असून, कानपूरमध्ये पुढच्या सहा दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
नुकत्याच आटोपलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात अजिंक्य रहाणेने दमदार कामगिरी केली होती. मात्र रोहित शर्माला अपेक्षेनुरूप कामगिरी करता आली नव्हती. पण या मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे चांगली कामगिरी करून दाखवण्याचे आव्हान रोहितसमोर असेल.

प्रतिस्पर्धी संघ -

भारत - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव

न्यूझीलंड - केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, मार्क क्रेग, मार्टिन गप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथहॅम, जेम्स नीशम, हेन्री निकोल्स, ल्यूक राँची, मिचेल सेंटनर, ईश सोढी, रॉस टेलर, नील वॅगनर, बी.जे. वॉटलिंग.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा