Advertisement

'भारत श्री' विजेत्यांना मिळणार ५० लाखांची बक्षिसं


'भारत श्री' विजेत्यांना मिळणार ५० लाखांची बक्षिसं
SHARES

भारतीय बाॅडीबिल्डिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच शरीरसौष्ठवपटूंवर ५० लाख रुपयांच्या बक्षिसांच उधळण केली जाणार अाहे. पुण्यातील बालेवाडीत २३ ते २५ मार्चदरम्यान रंगणाऱ्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत देशभरातून तब्बल ६०० पेक्षा अधिक बाॅडीबिल्डर्स अापल्या शरीससंपदेचं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाले अाहेत. ३१ राज्यं अाणि ८ शासकीय क्रीडा संस्थांमधील बाॅडीबिल्डर्स अापल्या पीळदार स्नायूंच्या प्रदर्शनानं सर्वांनाच मंत्रमुग्ध करतील. भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व खेळाडू अाणि पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित हॉटेलमध्ये आदरातिथ्य केले जाणार आहे.


किताब विजेता ७.५ लाखांचा धनी

भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत विजेत्यांवर ५० लाखांहून अधिक रकमेच्या बक्षिसांचा वर्षाव केला जाणार असून किताब विजेत्याला ७.५ लाखांचे इनाम देऊन गौरवण्यात येईल. उपविजेता ३.५ लाखांचा धनी होईल. तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला २ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. तसंच गटविजेताही लखपती होणार अाहे. गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १ लाख, ७० हजार, ५० हजार, ३० हजार आणि २० हजार रुपयांचे रोख इनाम देण्यात येईल.


महाराष्ट्राचे शूरवीर सज्ज

या स्पर्धेत महाराष्ट्राचे शूरवीर आपला ठसा उमटविण्यासाठी गेले दोन महिने घाम गाळत आहेत. या स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सलग दोनदा भारत श्री ठरलेला सुनीत जाधव, सागर कातुर्डे, मि. वर्ल्ड महेंद्र चव्हाण, नितीन म्हात्रे जोरदार तयारीत आहेत. या दिग्गजांकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. महाराष्ट्राचे 20 पेक्षा शूरवीर या स्पर्धेत उतरणार असल्यामुळे सांघिक विजेतेपदावरही महाराष्ट्राचे नाव कोरले जाणार, अशी शक्यता अाहे.


यजमानांसमोर रेल्वेचे तगडे अाव्हान

यंदा महाराष्ट्रासमोर तगडे आव्हान असेल ते रेल्वेचे. जावेद अली खान, राम निवास, किरण पाटील, सागर जाधव, भास्करन आणि प्रीतम चौगुले यांची तयारी पाहून सारेच अवाक झाले आहेत. त्याचप्रमाणे यतिंदर सिंग, दयानंद, बॉबी सिंग, सर्बो सिंगसारखे अनेक खेळाडू आपले सर्वोत्तम खेळ दाखविण्यासाठी सज्ज होत आहेत.


महिलांच्या स्पर्धेलाही वाढता प्रतिसाद

महिला गटातही देशभरातून किमान २५ शरीरसौष्ठवपटू येतील. यात सरिता देवी, रेबिता देवी, कांचन अडवाणी, ममता देवी, युरोपा भौमिक हे ओळखीचे चेहरेही असतील. त्याशिवाय फिजीक स्पोर्टस प्रकारात महिला आणि पुरूष मॉडेल मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे या गटातही जेतेपदासाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळेल. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची वजन तपासणी २३ मार्चला, प्राथमिक फेरी २४ मार्चला आणि अंतिम फेरी २५ मार्चला पार पडेल.


हेही वाचा -

महाराष्ट्र श्री किताब विजेत्याला मिळणार राॅयल एनफिल्ड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा