Advertisement

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी आजपासून

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामान्याला बुधवार, ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी आजपासून
SHARES

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामान्याला बुधवार, ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. भारत इंग्लंड दौऱ्यावर असून, भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

बुधवारपासून नॉटिंगहॅम इथं प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवण्यात येणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वातील अंतिम फेरीत पराभव पत्करल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नव्या अभियानाला प्रारंभ करण्यासाठी सज्ज आहे.

मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींचे ग्रहण लागले असून रोहित शर्माच्या साथीने के. एल. राहुलला सलामीसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

मधल्या फळीत कोहलीसह चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत यांचे स्थान पक्के असेल. भारताकडे जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर असे उत्तम पंचक उपलब्ध आहे. रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन यांच्यापैकी एकाला वगळून ४ वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय कोहली घेऊ शकतो.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, के. एल. राहुल, वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

इंग्लंड : जो रूट (कॅप्टन), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रॉवली, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, डोम सिबली, मार्क वूड.



हेही वाचा -

राज्यात ६ हजार नवीन कोरोना रुग्णांचं निदान

Unlock Guideline In Mumbai : मुंबईत काय सुरू? काय बंद? वाचा सविस्तर


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा