अजिंक्य रमलाय आमरस बनवण्यात

सध्या आंब्याचा सिझन सुरू असल्याने अजिंक्य स्वत:च्या हाताने आमरस बनवून खाण्यात रमला आहे. आमरस बनवतानाचा एक फोटो अजिंक्यने नुकताच ट्विटरवर शेअर आहे.

SHARE

इंडियन प्रीमियर लिग (IPL)च्या १२ वा सिझनमधील राजस्थान राॅयल्स टीमचा प्रवास संपुष्टात आला. रहाणे आणि स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या टीमने बाद फेरी गाठण्यासाठी बरीच मेहनत घेतली असली, तरी त्यात त्यांना यश आलं नाही. राजस्थानची शेवटची मॅच झाल्याने टीमचा कॅप्टन अजिंक्य रहाणे रिलॅक्स झाला आहे. सध्या आंब्याचा सिझन सुरू असल्याने अजिंक्य स्वत:च्या हाताने आमरस बनवून खाण्यात रमला आहे. आमरस बनवतानाचा एक फोटो अजिंक्यने  नुकताच ट्विटरवर शेअर आहे. 

आयपीएलचा सिझन संपल्यावर भारतीय संघ काही दिवसांनी इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकासाठी रवाना होणार आहे. अजिंक्यला भारतीय संघात जागा मिळवता आली नसली, तरी तो निराश झालेला नाही. लवकरच तो देखील इंग्लंडला काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार आहे. अजिंक्य काऊंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायर संघाकडून खेळणार आहे. त्याआधी तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. विश्वचषकानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करेल.  हेही वाचा-

सचिन-लक्ष्मण १४ मे रोजी BCCI च्या लवादासमोर होणार हजर

T20 मुंबई लीग: अर्जुन तेंडुलकरवर ५ लाखांची बोलीसंबंधित विषय
ताज्या बातम्या