सचिन-लक्ष्मण १४ मे रोजी BCCI च्या लवादासमोर होणार हजर

सचिन आणि लक्ष्मण बीसीसीआयच्या सल्लागार समितीचे सदस्य असूनही आयपीएलमधील संघासोबत कार्यरत असल्याचं म्हणत गुप्ता यांच्याकडून दुहेरी हितसंबंधाबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र दोघांनीही हे आरोप फेटाळून लावले आहेत.

SHARE

दुहेरी हितसंबंधाच्या प्रकरणात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना १४ मे रोजी लवादा समोर हजर राहावं लागणार आहे. या दोघांशिवाय तक्रारदार आणि मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय गुप्ता आणि बीसीसीआय प्रशासकीय समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांची देखील साक्ष नोंदवण्यात येणार आहे. या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लवाद अधिकारी डी. के. जैन यांच्याकडून काही दिवसांपूर्वी या दोघांना नोटीस बजावण्यात आली होती.

सचिन आणि लक्ष्मण बीसीसीआयच्या सल्लागार समितीचे सदस्य असूनही आयपीएलमधील संघासोबत कार्यरत असल्याचं म्हणत गुप्ता यांच्याकडून दुहेरी हितसंबंधाबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र दोघांनीही हे आरोप फेटाळून लावले आहेत.


सचिनचा पलटवार

एवढंच नाही, तर या परिस्थितीला बीसीसीआय जबाबदार असल्याचा आरोप सचिनने केला होता. ‘बीसीसीआय’च्या घटनेतील कलम ३८(३) नुसार, ‘नियंत्रित श्रेणी’तील वाद हा वैयक्तिक स्तरावर हाताळण्याजोगा किंवा त्या व्यक्तीने हितसंबंधांची पूर्ण माहिती दिल्यास तोडगा निघणारा आहे, असंही सचिनने म्हटलं आहे.


लक्ष्मणची नाराजी

तर, सल्लागार समितीच्या सदस्यांचा सल्ला केवळ वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षक निवडीवेळी घेतला जातो. आमची विस्तारित भूमिका अस्पष्ट असल्याचं उत्तर लक्ष्मणने नोटीशीला दिलं होतं. सोबतच विनोद रॉय यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय समितीच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली होती.हेही वाचा-

T20 मुंबई लीग: अर्जुन तेंडुलकरवर ५ लाखांची बोली

हार्दिक, राहुलला 'कॉफी' भोवली; लोकपालांकडून २० लाखांचा दंडसंबंधित विषय
ताज्या बातम्या