Advertisement

IPL2021 : वरुणची प्रभावी फिरकी आणि रसेलची दमदार गोलंदाजी; कोलकताकडून बंगळुरू पराभूत


IPL2021 : वरुणची प्रभावी फिरकी आणि रसेलची दमदार गोलंदाजी; कोलकताकडून बंगळुरू पराभूत
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या पर्वाचा दुसरा टप्पा रविवार १९ सप्टेंबरपासून सुरू झाला. कोरोनामुळं ब्रेक लागलेली आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरू झाली. दरम्यान या दुसऱ्या पर्वात खेळाडूंनी आपली खेळी दाखवण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार, कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकातानं रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा ९ गडी आणि ६० चेंडू राखून फडशा पाडला.

फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (३/१३), आंद्रे रसेल (३/९) यांनी केलेली प्रभावी गोलंदाजी आणि शुभमन गिल (४८ धावा), पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर (नाबाद ४१) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या बळावर कोलकातानं बेंगळूरुचा पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना बेंगळूरुचा डाव अवघ्या ९२ धावांत आटोपला. देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक २२ धावा केल्या. विराट कोहली (५), एबी डीव्हिलियर्स (०), ग्लेन मॅक्सवेल (१०) यांनी निराशा केल्यामुळे बेंगळूरुला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा