Advertisement

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत: पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

पहिल्या कसोटी सामन्याकरीता रोहित आणि मुरली विजय ही सलामीची जोडी पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांच्यावर धुरा असून आर. अश्विनवर फिरकीची मदार असणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत: पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर
SHARES

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटी मालिकेसाठी भारतीय नियामक मंडळानं (बीसीसीआय) १२ खेळाडूंची घोषणा केली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका गुरूवारपासून अॅडलेड इथं सुरू होणार आहे. या सामन्यात रोहित शर्माचं पुनरागमन झालं अाहे. तसंच, पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाल्यामुळे लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना पहिल्या सामन्यात सलामीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


नवी जोडी

पहिल्या कसोटी सामन्याकरीता रोहित आणि मुरली विजय ही सलामीची जोडी पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांच्यावर धुरा असून आर. अश्विनवर फिरकीची मदार असणार आहे.

रहाणे, पुजाराकडे लक्ष

ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका भारतीय संघानं १-१ अशी बरोबरीत राखली. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष कसोटी मालिकेकडे लागलं आहे. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि कसोटीवीर चेतेश्वर पुजारा यांच्याकडे देखील चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांना संघात स्थान मिळालं नसून फिरकीपटू रवींद्र जडेजा यालाही संघाबाहेर राहावं लागलं आहे.


भारतीय संघः

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के.एल. राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), आर. अश्विन, मो. शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.


ऑस्ट्रेलिया संघः

मार्कस हॅरिस, एरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँडस्कॉम्ब, ट्रॅविस हेड, टिम पेन (कर्णधार), पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, नाथन लियोन, जोश हेजलवूड.



हेही वाचा-

मुंबईच्या क्रिकेटपटूंसोबत दुजाभाव, सुनील गावस्कर यांचा निवड समितीवर धक्कादायक आरोप

पृथ्वी शॉची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा