Advertisement

पडद्यामागचे पाठीराखे खूपच महत्त्वाचे - जेमिमा रॉड्रिग्ज


पडद्यामागचे पाठीराखे खूपच महत्त्वाचे - जेमिमा रॉड्रिग्ज
SHARES

वयाच्या चौथ्या वर्षी मी हातात पहिल्यांदा बॅट घेतली. माझ्या घरात कुणीच खेळामध्ये करिअर घडवले नव्हते. घरातील मी पहिली खेळाडू. मात्र अांतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी मानसिक कणखरता महत्त्वाची असते. जो मानसिकदृष्ट्या कणखर, तोच चमक दाखवतो. पण या खडतर वाटचालीत पडद्यामागचे पाठीराखे फारच महत्त्वाचे असतात, असे मत भारतीय संघातील महिला क्रिकेटपटू जेमिमा राॅड्रिग्स हिने सांगितले. २८व्या कल्पेश कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला ५ मेपासून मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईतील विविध मैदानांवर सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ती बोलत होती.


मानसिक कणखरतेमध्ये अापण कमी पडतो

आपले खेळाडू आणि परदेशातील खेळाडू यांची गुणवत्ता सारखी आहे. मात्र मानसिकदृष्ट्या कणखरतेमध्ये आपण थोडे कमी पडतो. मानसिकदृष्ट्या सक्षम असल्यास यश हमखास मिळते. याच बळावर आपल्या अनेक खेळाडूंनी जगावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या सक्षम बना. भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळाले, हे माझे भाग्यच समजते. युवा क्रिकेटपटूंनी खेळाप्रति प्रेम आणि निष्ठा कायम राखावी, असे आवाहन जेमिमा हिने यावेळी केले.


वयचोरी टाळण्यासाठी एमसीएचा पुढाकार

वयचोरीचा मुद्दा कायमस्वरूपी निकालामध्ये काढण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे ठोस पावले उचलली जात असून त्यासाठी सर्व खेळाडू आणि पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन एमसीएचे पदाधिकारी डाॅ. उन्मेश खानविलकर यांनी केले.


हेही वाचा -

कल्पेश कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा ५ मेपासून

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा