Advertisement

कल्पेश कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा ५ मेपासून


कल्पेश कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा ५ मेपासून
SHARES

मुंबईलाच नव्हे तर देशाला राष्ट्रीय अाणि अांतरराष्ट्रीय दर्जाचे अव्वल क्रिकेटपटू देणाऱ्या कल्पेश गोविंद कोळी स्मृति चषक क्रिकेट स्पर्धेला ५ मे २०१८ पासून सुरुवात होत अाहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मान्यतेने होणारी ही स्पर्धा म्हणजे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरातील १६ वर्षांखालील मुलांसाठी एक पर्वणीच ठरू लागली अाहे. न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबतर्फे गेली २७ वर्षे शिस्तबद्ध पद्धतीने या स्पर्धेचे अायोजन करण्यात येत अाहे. 



दोन नव्या सेंटरचा समावेश

यापूर्वी ही स्पर्धा मुंबईपासून ते विरारपर्यंत खेळवली जायची. यावर्षी त्यात अाता खास अाग्रहास्तव नवी मुंबईतील बेलापूर अाणि सानपाडा या दोन सेंटरचा समावेश करण्यात अाला अाहे. त्यामुळे ही स्पर्धा कांदिवली, विरार, वांद्रे, कलिना, माटुंगा, बेलापूर अाणि सानपाडा या ठिकाणी ५ ते २६ मेदरम्यान खेळविण्यात येईल. त्याचबरोबर सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंचा टी-शर्टस तसेच त्यांना जेवणही पुरविण्यात येणार अाहे.



जेमिमा राॅड्रिग्सच्या हस्ते उद्घाटन

या स्पर्धेचे उद्घाटन ५ मे रोजी मेजर रमेश दडकर मैदान, माटुंगा येथे सकाळी ८.४५ वाजता भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू जेमिमा राॅड्रिग्स हिच्या हस्ते होणार अाहे. यावेळी मराठी अभिनेता अतुल परचुरेही उपस्थित राहणार अाहे. त्याचबरोबर पारितोषिक वितरण समारंभ लिटिलमास्टर सुनील गावस्कर यांच्या हस्ते होणार अाहे.


हेही वाचा -

पृथ्वी शाॅचे तंत्र सचिन तेंडुलकरसारखे - मार्क वाॅने केली स्तुती

सुनील गावस्कर यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा