Advertisement

सुनील गावस्कर यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस


सुनील गावस्कर यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस
SHARES

भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची बीसीसीअायने प्रतिष्ठेच्या ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस केली अाहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी तर भारताला १९ वर्षांखालील वर्ल्डकप जिंकून देणारे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात अाली अाहे. प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी या शिफारशींच्या बातमीला दुजोरा दिला अाहे.


कोहलीची खेलरत्नसाठी शिफारस

कोहलीची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात अाली अाहे. यापूर्वी २०१६ मध्येही कोहलीची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात अाली होती. मात्र २०१६ हे वर्ष अाॅलिम्पिकचे असल्यामुळे देशाला अाॅलिम्पिक पदक पटकावून देणाऱ्या पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक अाणि दीपा कर्माकर यांना या पुरस्काराने गौरवण्यात अाले होते.


स्मृती मंधानाची अर्जुनसाठी शिफारस

भारताचा सलामीवीर शिखर धवन अाणि महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात अाली अाहे. २१ वर्षीय स्मृती मंधाना हिनं गेल्या वर्षी झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही तिनं ५३१ धावा फटकावल्या होत्या.


हेही वाचा -

आणि गावस्कर मंत्रालयात अवतरतात तेव्हा

सुनील गावस्कर यांच्या नावाने स्टेडियम, तेही अमेरिकेत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा