Advertisement

आणि गावस्कर मंत्रालयात अवतरतात तेव्हा


आणि गावस्कर मंत्रालयात अवतरतात तेव्हा
SHARES

चांद्यापासून बांद्यापर्यंतचे आणि शेतकऱ्यांपासून ते विकासकामापर्यंतचे सगळ्यांचे प्रश्न मांडण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे राज्याचं अधिवेशन. अधिवेशन कालावधीत राज्यातील अनेक मंत्री व आमदारांचा ठिय्या विधानभवनात असल्याने अनेक दिग्गजांची ये-जा इथं नेहमीचीच. अशाच गर्दीत बुधवारी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचं दर्शन विधानभवनात घडलं.


वाढत्या अपघातांसाठी घेतला पुढाकार

सुनील गावस्कर आले ते परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी. वाहनांचे वाढते अपघात व वाहनांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी गावस्कर यांनी स्वत:हून पुढाकार घेतला आहे. गावस्कर यांनी एका प्रदर्शनीय क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं आहे. त्याच्या निमंत्रणासाठीच ते स्वतः विधानभवनात दाखल झाले होते.


वानखेडेवर २४ मार्चला रंगणार सामना

महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, सुरेश रैना यांसारखे रथी-महारथी खेळाडू या सामन्यात खेळणार आहेत. 'हाॅर्न नाॅट अोके प्लीज' आणि 'रस्ते सुरक्षा अभियान' असे दोन संघ तयार केले जाणार आहेत. या दोन्ही संघात येत्या २४ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर लढत होणार आहे.


सोनाली कुलकर्णीही दिसली होती

याआधी महिला दिनाच्या निमित्तानं मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं विधानभवनात एन्ट्री केली होती. त्यामुळे अधिवेशन काळात फक्त मंत्री आणि आमदार सोडून कलाकार, क्रिकेटपटू किंवा अन्य दिग्गज मंडळी आपल्याला दिसल्यास, आश्चर्य वाटायला नको.


हेही वाचा - 

सुनील गावस्कर यांच्या नावाने स्टेडियम, तेही अमेरिकेत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा