Advertisement

ढोल ताशांचा गजरात अजिंक्य रहाणेचं मुंबईत जंगी स्वागत


ढोल ताशांचा गजरात अजिंक्य रहाणेचं मुंबईत जंगी स्वागत
SHARES

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. कर्णधार विराटी कोहली ३६ ऑल आऊटनंतर पत्नी अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतल्यानंतर भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यानं कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व केलं.

अजिंक्यच्या नेतृत्वाखाली खेळताना मेलबर्न कसोटीत खणखणीत शतक झळकावून टीम इंडियाच्या खेळाडूंचं मनोबल वाढवलं आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यानंतरच्या पुढील २ कसोटीत अत्यंत मोलाची कामगिरी करत कसोटी मालिका आपल्या ताब्यात घेतली. 


मुंबईतील रुपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट हांथरण्यात आले होते. २ महिन्यांहून अधिक काळ लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यनं मुलीची गळाभेट घेतली तो क्षण भावनिक करणारा ठरला. ढोल ताशांच्या गजरात अजिंक्यचं स्वागत करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेत अजिंक्यनं त्याचे नेतृत्व कौशल्य जगाला दाखवून दिले.

आर अश्विन व हनुमा विहारी यांची झुंज, रवींद्र जडेजाची प्रभावी गोलंदाजी, मोहम्मद सिराजचा अफलातून मारा, शार्दूल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदरची दमदार खेळी, चेतेश्वर पुजारानं उभारलेली भिंत आणि रिषभ पंतची तुफान फटकेबाजी. या सर्व खेळाडूंनी मिळून हा दौरा अश्विस्मरणीय केला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी घोषणा करीत पाच कोटींचा बोनस जाहीर केला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा