Advertisement

८ वर्षांनंतर, ८ गडी राखून पंजाबनं केला मुंबईचा मोहालीत पराभव

मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात मोहाली येथे झालेल्या समान्यात पंजाबनं ८ गडी राखून पराभव केला आहे. मुंबईनं या सामन्यात पंजाब समोर १७७ धावांच लक्ष्यं ठेवलं होतं.

८ वर्षांनंतर, ८ गडी राखून पंजाबनं केला मुंबईचा मोहालीत पराभव
SHARES

मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात मोहाली येथे झालेल्या समान्यात पंजाबनं ८ गडी राखून पराभव केला आहे. मुंबईनं या सामन्यात पंजाब समोर १७७ धावांच लक्ष्यं ठेवलं होतं. हे लक्ष्य पार करत असताना सलामीवीर फलंदाज के. एल. राहूल आणि ख्रिस गेल तसंच, मयांक अग्रवाल यांनी किंग्स इलेव्हन पंजाबला मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय मिळवून दिला आहे. दरम्यान, २०११ पासून मुंबईचा संघ मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर  पराभूत झाला नव्हता. मात्र, शनिवारी झालेल्या सामन्यात तब्बल आठ वर्षांनंतर मुंबईला पहिल्यांदाच मोहालीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.



पांड्या ब्रदर्सची अप्रतीम खेळी

या समान्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि डी-कॉक यांनी चांगली सुरुवात केली. क्विंटन डी-कॉकनं ६० धावांची अर्धशतकी खेळी केली असून, या दोघानी पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. मात्र ठाराविक अंतरानं दोघेही माघारी परतले. रोहित आणि डी-कॉक माघारी परतल्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांनी कमी धाव संख्येत उर्वरित फलंदाजांना बाद केलं. परंतू, यांच्यानंतर आलेल्या पांड्या ब्रदर्सनी संघाचा डाव सावरला. धमाकेदार फटकेबाजी त्यांनी करत १७६ धावांपर्यंत मजल मारली आणि पंजाब समोर १७७ धावाचे आव्हान उभं केलं.


१७७ धावांच लक्ष्यं

मुंबईनं उभं केलेल्या १७७ धावांच लक्ष्यं पार करताना किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेल, लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी चांगली फटकेबाजी करत१७७ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. पंजाबकडूल सलामीवीर लोकेश राहुलने अर्धशतक झळकावलं, त्याला मयांक आणि ख्रिस गेलने फटकेबाजी करत चांगली साथ दिली. या सामन्यात गेल आणि राहुल यांच्या जोडीनं ५३ धावांची भागीदारी केली. तसंच के. एल. राहुलनं नाबाद ७१ धावा केल्या.

प्रथम गोलंदाजी करताना पंजाबचा फिरकी गोलंदाज मुरगन आश्विन, जलद गोलंदाज मोहम्मद शमी आणि विल्जोएन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. त्यांनंतर अँड्रू टायने १ बळी घेत चांगली साथ दिली. त्यानंतर मुंबईच्या संघातून फिरकी गोलंदाज कृणाल पांड्यानं २ बळी घेतले. याव्यतिरीक्त एकाही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.



हेही वाचा -

मुंबईतील पायाभूत सोईंसाठी २.७५ लाख कोटी रुपये

मतदान, मतमोजणी दरम्यान ३ दिवस 'ड्राय-डे'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा