IPL 2020 : राजस्थानचा 'हा' खेळाडू झाला दिल्लीकर


SHARE

इंडियन प्रमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला लिलाव होणार आहे. असं असलं तरी सध्यस्थितीत अनेक खेळाडूंची संघात अदलाबदल होताना पाहायला मिळते आहे. राजस्थान रॉयल्सचा प्रमुख खेळाडू अजिंक्य रहाणे यानं आपल्या संघाची साथ सोडली आहे. आगामी हंगामाकरता अजिंक्य दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबत घोषणा केली आहे.


२ संघांचं प्रतिनिधीत्व

आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणे यानं आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या २ संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतीय वन-डे आणि टी-२० संघात अजिंक्यला स्थान मिळत नसलं तरीही आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळत असताना त्यानं सलामीवीराची भूमिका बजावली आहे.

२ शतकांची नोंद

आयपीएलमध्ये अजिंक्यच्या नावावर २ शतकांची देखील नोंद आहे. दरम्यान, आगामी हंगामात दिल्लीकर अजिंक्य रहाणे कशी कामगिरी करणार, तसंच संघाला आयपीएलचं चषक मिळवून देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

'ठाकरे २'च्या स्क्रिप्टच्या कामाला सुरूवात - नवाजुद्दीन सिद्धिकी

मुंबईसह राज्यात प्राप्तीकर विभागाचे ३७ ठिकाणी छापेसंबंधित विषय
ताज्या बातम्या