Advertisement

'ठाकरे २'च्या स्क्रिप्टच्या कामाला सुरूवात - नवाजुद्दीन सिद्धिकी


'ठाकरे २'च्या स्क्रिप्टच्या कामाला सुरूवात - नवाजुद्दीन सिद्धिकी
SHARES
Advertisement

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ठाकरे चित्रपटानं शिवसैनिक आणि महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवलं. तसंच, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर सर्व शिवसैनिक बाळासाहेबांचा राजकारणातील प्रवास कसा होता हे पाहण्यासाठी दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत होते. मात्र, यांची प्रतिक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. याच कारण म्हणजे या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असून, 'ठाकरे-२' चं काम सुरू झाला असल्याचा खुलासा चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी यानं केला आहे.

चित्रीकरणाला सुरुवात

'ठाकरे २' च्या स्क्रिप्टवर काम सुरू झालं आहे, स्क्रिप्ट लिहून पूर्ण झाल्यावर आम्ही चित्रीकरणाला सुरुवात करणार आहोत. पहिल्या भागात ठाकरेंची भूमिका मी साकारली असल्यानं दुसऱ्या भागातही मीच त्या भूमिकेत दिसणार आहे. स्क्रिप्टचं काम पूर्ण झाल्यावर संजय राऊत मला सांगणार आहेत. त्यांचा निरोप आल्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात होईल. चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणं मला नेहमीच आव्हानात्मक वाटतं पण ही भूमिका साकारायला तितकाच आनंदही वाटतो', असं नवाजुद्दीन सिद्धिकी यानं म्हटलं.

प्रमोशनमध्ये व्यस्त

नवाजुद्दीन सिद्धिकी सध्या आगामी चित्रपट 'मोतीचूर चकनाचूर' याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी नवाजसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याशिवाय 'मोतीचूर चकनाचूर' १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.हेही वाचा -

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे संजय राऊतांकडून तोंड भरून कौतुक

मध्य रेल्वेच्या 'या' एक्स्प्रेस होणार ‘उत्कृष्ट’संबंधित विषय
Advertisement