Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

MI vs DC : 'दिल्ली' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा विजय; गुणतालिकेतही अव्वल स्थानी

दिल्लीनं ठेवलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मुंबईचा सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं विजय मिळवला आहे.

MI vs DC : 'दिल्ली' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा विजय; गुणतालिकेतही अव्वल स्थानी
SHARES

मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईनं दिल्लीवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. दिल्लीनं ठेवलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मुंबईचा सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं (mumbai) विजय मिळवला आहे. 

नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या भेदक माऱ्याचा सामना करताना दिल्लीच्या डावाची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर पृथ्वी शॉ ४ धावांवर माघारी परतला. पहिली संधी मिळालेला अजिंक्य रहाणेही (ajinkya rahane) १५ धावांवर बाद झाला. कर्णधार अय्यर आणि सलामी फलंदाज शिखर धवनने (shikhar dhawan) दिल्लीचा डाव सावरला आणि १४व्या षटकात संघाला शतक करून दिलं. कर्णधार श्रेयस अय्यर ३३ चेंडूत ४२ धावा काढून बाद झाला. 

दिल्लीन दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने संयमी सुरूवात केली. मात्र कर्णधार रोहित शर्मा मोठा फटका खेळताना ५ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर सलामीवीर क्विंटन डी कॉकने फटकेबाजी करत ३४ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलं. या स्पर्धेतील हे त्याचं दुसरं अर्धशतक ठरलं. 

अर्धशतक झळकावल्यावर क्विंटन डी कॉक लगेचच झेलबाद झाला. त्याने ३६ चेंडूत ५३ धावा केल्या. त्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमार यादवने फटकेबाजी करत ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पण धडाकेबाज अर्धशतकानंतर लगेचच सूर्यकुमारही माघारी परतला. त्याने ३२ चेंडूत ५३ धावा करत ६ चौकार आणि १ षटकार खेचला. 

या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ हा १० गुणांसह अव्वल स्थानावर होता. कारण या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघाने सहा सामन्यांमध्ये पाच विजय मिळवले होते, तर त्यांना एका सामन्यात पराबव पत्करावा लागला होता. त्यामुळे दिल्लीचा संघ अव्वल स्थानावर होता. या सामन्यात दिल्लीला पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांचे आणि मुंबईचे समान १० गुण आहेत. पण चांगल्या रनरेटच्या जोरावर मुंबईच्या संघाने अव्वल स्थान पटकावले असून दिल्लीच्या संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा