Advertisement

IPL 2020 : तेराव्या हंगामासाठी 'असा' आहे मुंबई इंडियन्सचा संघ

खेळाडूंच्या लिलावात गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघानं ६ खेळाडूंना संघात स्थान दिलं.

IPL 2020 : तेराव्या हंगामासाठी 'असा' आहे मुंबई इंडियन्सचा संघ
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तेराव्या हंगामाचा लिलाव कोलकाता शहरात पार पडला. आयपीएलमधील सर्व संघाच्या मालकांनी विविध खेळाडूंवर बोली लावत त्यांना आपल्या संघात सामील करून घेतलं. सुमारे ३०० पेक्षा जास्त खेळाडूंवर यादरम्यान बोली लावण्यात आली.

६ खेळाडूंना स्थान

या लिलावात गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघानं ६ खेळाडूंना संघात स्थान दिलं. ख्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसीन खान, फॅबिअन अ‍ॅलन, प्रिन्स बलवंत राय सिंह, दिग्विजय देशमुख या सहा खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे. दरम्यान, ख्रिस लिन संघात स्थान दिल्यानं मुंबई इंडियन्सची फलंदाजी अणखी तगडी होणार आहे. तसंच, ट्रेंट बोल्ट यालाही संघात घेतल्यामुळं गोलंदाजांमध्ये भर पडली आहे.

मुंबई इंडियन्स संघ :

फलंदाज : रोहित शर्मा, शेर्फन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लिन (२ कोटी रुपये), सौरभ तिवारी (५० लाख).

गोलंदाज : धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेनघन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, मोहसीन खान (२० लाख), फॅबिअन अ‍ॅलन (५० लाख), प्रिन्स बलवंत राय सिंह (२० लाख), दिग्विजय देशमुख (२० लाख).

अष्टपैलू : हार्दिक पांड्या, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, अनुकूल रॉय, नॅथन कुल्टर-नाईल (८ कोटी).

यष्टीरक्षक : इशान किशन, क्विंटन डी-कॉक, आदित्य तरे.



हेही वाचा -

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना पूर्णपणे क्लीन चीट, एसीबीचं कोर्टात शपथपत्र

साखरेचे दर वाढणार?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा