Advertisement

अखेर 'मुंबई'नं विजय मिळवला; मात्र अजुनही तळ्यात मळ्यात

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं ६ गडी आणि ६ चेंडू राखून पंजाब किंग्जवर विजय मिळवला.

अखेर 'मुंबई'नं विजय मिळवला; मात्र अजुनही तळ्यात मळ्यात
SHARES

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं ६ गडी आणि ६ चेंडू राखून पंजाब किंग्जवर विजय मिळवला. किरॉन पोलार्डची अष्टपैलू चमक (नाबाद १५ धावा आणि २ बळी) आणि हार्दिक पंड्या (नाबाद ४०), सौरभ तिवारी (४५) यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळं मुंबईला हा विजय मिळवता आला. या विजयासह मुंबईच्या संघानं प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. परंतू, या विजयावर मुंबईला समाधान मानता येणार नाही. आता मुंबईचे ३ सामने शिल्लक असून उर्वरित तिन्ही सामने जिंकल्यानंतर त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे.

मुंबईच्या सध्याच्या पॉइण्ट्स टेबलवरुन मुंबईची इतर ३ संघाशी चौथ्या जागेसाठी चुरशीची लढत होण्याचं चित्र दिसत आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबचे खेळाडू ठराविक अंतरानं बाद झाले. ४ बाद ४८ धावांवरून एडिन मार्करम (४२) आणि दीपक हुडा (२८) यांनी ६१ धावांची भागीदारी रचल्यामुळं पंजाबनं ६ बाद १३५ धावा केल्या.

प्रत्युत्तरात बऱ्याच कालावधीनंतर सूर गवसलेल्या हार्दिकनं १९व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयी षटकार लगावून मुंबईला पाचवा विजय मिळवून दिला. त्यानं सौरभसह ३१, तर पोलार्डसह ४५ धावांची भागीदारी केली. या सामन्यात पोलार्डनं २०-२०मधील ३०० विकेटचा टप्पाही गाठला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा