Advertisement

अन् पंजाब किंग्सला 'ती' चूक पडली महागात!

राजस्थान रॉयल्सनं पंजाब किंग्जवर २ धावांनी विजय मिळवला.

अन् पंजाब किंग्सला 'ती' चूक पडली महागात!
SHARES

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १४ व्या पर्वाच्या दुसऱ्या सत्राला सुरूवात झाली आहे. या सत्रातील आतापर्यंतचे सामने अतीतटीचे होताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी या सत्रातील तिसरा सामना व आयपीएल २०२१चा ३२वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झाला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत अटीतटीचा पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्सनं पंजाब किंग्जवर २ धावांनी विजय मिळवला. पंजाबच्या एडम मार्कराम आणि निकोलस पूरन यांना शेवटच्या षटकात ४ धावांची गरज होती, पण राजस्थानचा गोलंदाज कार्तिक त्यागीने एकच धाव देत आणि २ विकेट्स घेत सामना आपल्या बाजूनं फिरवला.

नाणेफेक गमावलेल्या संजू सॅमसनच्या संघानं प्रथम फलंदाजी करत एविन लुईस, यशस्वी जयस्वाल आणि महिपाल लोमरोर यांच्या योगदानाच्या जोरावर पंजाबला १८६ धावांचे आव्हान दिले. पंजाबकडून अर्शदीप सिंगने ३२ धावांत ५ बळी घेतले. प्रत्युत्तरात पंजाबचे सलामीवीर के.एल.राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी १२० धावांची दमदार सलामी दिली. मयंकनं अर्धशतकी खेळी केली.

मात्र, राजस्थानच्या गोलंदाजांपुढं यांना आपली खेळी टिकवता आली नाही. पंजाबला २० षटकात केवळ १८२ धावाच करता आल्या. पंजाब किंग्सला २ धावांनी पराभव पत्करावा लागला. पंजाबनं एक चुकीचा निर्णय घेतला आणि आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. ही चूक एवढी मोठी होती की सामना गमवावा लागला. राजस्थान रॉयल्सविरोधातील या मॅचमध्ये पंजाबनं ख्रिस गेलला खेळविले नाही. पंजाबनं गेलऐवजी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करमला संधी दिली होती. त्याने 20 चेंडूत 26 धावा काढल्या. हा संथपणा पाहता काही रन्स जर जास्त झाले असते तर पंजाबला एवढं झुंजावं लागलं नसतं आणि विजयही पदरी पडला असता.

एडन मार्करम क्रीझवर असूनही पंजाबला जिंकवून देऊ शकला नाही. यामुळं पंजाबच्या टीम सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पंजाब किंग्स जर गेलला संघात खेळविले असते तर २ धावांनी पराभव पत्करावा लागला नसता.

राजस्थान रॉयल्सने पंजाबला 186 रन्सचे लक्ष्य दिले होते. विजयासाठी १८६धावांचे लक्ष्य गाठताना पंजाबने ४ विकेट गमावून १८३ धावा बनविल्या. शेवटच्या ५ ओव्हरमध्ये पंजाबला ३८ धावांची गरज होती. क्रिस मॉरिसच्या १६व्या ओव्हरमध्ये केवळ ६ धावा काढता आल्या. यानंतर पंजाबला शेवटच्या ३ ओव्हरमध्ये १८ धावांची गरज होती. पूरन आणि मार्कराम यांनी अत्यंत धीम्या गतीनं खेळत लक्ष्यापर्यंत पोहोचविले परंतू जिंकवून देऊ शकले नाहीत. या सामन्याकरीता त्यागीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा