Advertisement

IPL 2021: किंग्स इलेव्हन पंजाबनं मॅक्सवेलला दिली सोडचिठ्ठी

गेल्या वर्षी अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलसह काही बड्या खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

IPL 2021: किंग्स इलेव्हन पंजाबनं मॅक्सवेलला दिली सोडचिठ्ठी
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या पर्वात मुंबई इंडियन्सच्या संघानं पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. या पर्वात सर्वच संघांनी उत्तम कामगिरी केली. असं असलं तरी पंजाबनं धमाकेदार खेळ करून दाखवला. पंजाबचे सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी दमदार कामगिरी करत आपली छाप उमटवली. पण शेवटच्या टप्प्यात केलेल्या चुकांमुळं त्यांना गुणतक्त्यात ६व्या स्थानी समाधान मानांव लागलं.

यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणारे नवे चेहरे घेण्याचा विचार पंजाबची संघमालक प्रिती झिंटा आणि संघ व्यवस्थापनाचा आहे. त्यामुळे गेल्या वर्षी अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलसह काही बड्या खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

करारमुक्त खेळाडू

ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, हार्डस विल्जॉएन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉट्रेल, जिमी नीशम, कृष्णाप्पा गौथम, तजिंदर सिंह.

कायम ठेवलेले खेळाडू

के एल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभसिमरन सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा