Advertisement

जुहू हिरोजला पहिल्यांदाच पराभवाचा धक्का


जुहू हिरोजला पहिल्यांदाच पराभवाचा धक्का
SHARES

साई-मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीगमध्ये अातापर्यंत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या जुहू हिरोजला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. प्रतिक पाटील अाणि तेजस सोलंकी हे जुहू हिरोजचे दोन्ही सलामीवीर प्रथमच अपयशी ठरल्यामुळे जुहू हिरोजवर सांताक्रूझ क्रॅकर्सने ४८ धावांनी मात केली. सांताक्रूझ क्रॅकर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रोहन सदरजोशी अाणि मिलिंद दरेकर यांच्या शतकी भागीदारीमुळे १८ षटकांत ६ बाद १७३ धावा उभारल्या होत्या. मात्र हे उद्दिष्ट गाठताना जुहू हिरोजचे दोन्ही सलामीवीर लवकरच माघारी परतले अाणि त्यानंतर त्यांना विजयी लक्ष्य गाठता अाले नाही.


रोहन-मिलिंदची अर्धशतकी खेळी

अमेय कोठावळे (३) अाणि अमोल मोडक (१४) या सलामीवारांना मोठी खेळी करण्यात अपयश अाल्यामुळे सांताक्रूझ क्रॅकर्सची अवस्था ३.१ षटकांत २ बाद २४ अशी झाली होती. त्यानंतर मात्र रोहन सदरजोशी अाणि मिलिंद दरेकर यांनी सांताक्रूझच्या डावाला अाकार दिला. या दोघांनी अर्धशतकी खेळी करत सांताक्रूझला मजबूत स्थितीत अाणून ठेवले. रोहनने ३८ चेंडूंत १० चौकारांसह ५९ धावा फटकावल्या. मिलिंदने ३५ चेंडूंत ४ चौकार अाणि ३ षटकारांच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली.


जुहू हिरोजचे फलंदाज अपयशी

फलंदाजांच्या जोरावर अातापर्यंत तीन सामने जिंकणाऱ्या जुहू हिरोजचे फलंदाज मात्र सांताक्रूझ क्रॅकर्सविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरले. एमएमपीएलमध्ये सर्वाधिक धावा फटकावणारा प्रतीक पाटील धावचीत झाला अाणि जुहू हिरोजची पडझड सुरू झाली. त्यातच निखिल पागधरेने तीन विकेट्स मिळवत जुहूला धक्के दिले. त्यामुळे त्यांना १८ षटकांत १२५ धावांपर्यंतच मजल मारता अाली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा