कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा 6 मे पासून

 Mumbai
कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा 6 मे पासून
Mumbai  -  

27 वी एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा येत्या 6 मे पासून मुंबईत रंगणार आहे. यंदाच्या स्पर्धेत एकूण 16 संघांचा समावेश असेल. स्पर्धेतील प्रत्येक सामना दोन दिवसांचा साखळी तसेच बाद पद्धतीने खेळवण्यात येईल. गेल्या 26 वर्षांपासून 'न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब'तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

6 मे ते 28 मे 2017 या कालावधीत ही स्पर्धा कांदिवली, विरार, वांद्रे, कलिना, माटुंगा आणि मरीन लाईन्स येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरातील 16 वर्षांखालील मुलांनाही खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना शनिवारी, माटुंगा येथील मेजर रमेश दडकर या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

विरार-पालघर सेंटर, डहाणू-पीडीटीएसए सेंटर, गोरेगाव सेंटर, वांद्रे सेंटर, वसई सेंटर, वरळी सेंटर, कालिना सेंटर, कांदिवली सेंटर, घाटकोपर सेंटर, शिवाजी पार्क सेंटर, डॉ. डी. वाय. पाटील सेंटर, माटुंगा सेंटर, ठाणे सेंटर, माहुल सेंटर, आझाद मैदान सेंटर, कल्याण-भिवंडी सेंटर या संघांचा स्पर्धेत समावेश असणार आहे.

Loading Comments