Advertisement

एकाच ओव्हरमध्ये ६ सिक्स, पोलार्ड बनला तिसरा खेळाडू

वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पोलार्डनं अकिला धनंजय याच्या एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारून रेकॉर्ड केला.

एकाच ओव्हरमध्ये ६ सिक्स, पोलार्ड बनला तिसरा खेळाडू
SHARES

वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड याने एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड करणारा पोलार्ड हा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी युवराज सिंह  आणि हर्षल गिब्ज यांनी ही कामगिरी केली होती. युवराजने टी-२० क्रिकेटमध्ये तर गिब्जने वन-डे क्रिकेटमध्ये  एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारून रेकॉर्ड केला होता.

वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पोलार्डनं अकिला धनंजय याच्या एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारून रेकॉर्ड केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आहे.

पोलार्डनं या मॅचमध्ये ११ बॉलमध्ये ३८ रन काढले. यामध्ये एका ओव्हरमध्ये सलग सहा सिक्सचा समावेश आहे. युवराज सिंहनं इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला ६ सिक्स लगावले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जनं ही कामगिरी केली असून त्याने २००७ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड विरुद्ध हा रेकॉर्ड केला आहे.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पोलार्डला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आले. पोलार्डने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेला २० षटकात १३१ धावा करता आल्या. हे आव्हान त्यांनी १३.१ ओव्हरमध्ये ६ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. 

संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा