Advertisement

संतोषकुमार घोष स्पर्धेत मारिया सी. सी. अजिंक्य


संतोषकुमार घोष स्पर्धेत मारिया सी. सी. अजिंक्य
SHARES

ओव्हल मैदानावर सोमवारी झालेल्या 'संतोषकुमार घोष ट्रॉफी' या 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत मारिया सी. सी. ने अलमायटी संघावर 270 धावांनी दणदणीत विजय मिळविला. मनिष यादवचे (103) शतक आणि डावखुरा फिरकी गोलंदाज फरहान शेख याने केवळ 3 धावांत घेतलेले 6 बळी यांच्या कामगिरीमुळे हा विजय साध्य झाला.

मारिया सी. सी. संघाचा मनिष यादव (103) आणि फरहान शेख (55) यांनी 140 धावांची सलामी दिली. त्यात मेहताब उस्मानी (35) आणि अयाझ खान (37) यांनी आणखी भर टाकत संघाला 39 षटकात 6 बाद 314 धावांचा पल्ला गाठून दिला. नंतर फरहान शेख या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने केवळ 3 धावांत 6 बळी मिळवत प्रतिस्पर्धी अलमायटी संघाला 44 धावांत गुंडाळले. अनिरुद्ध पत्की यानेही 3 धावांत 3 बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. यावेळी भारताच्या माजी महिला कसोटीवीर अरुंधती घोष, एम. सी. ए. च्या ज्युनिअर निवड समितीचे प्रशांत सावंत उपस्थित होते.

तसेच सोमवारी झालेल्या इतर सामन्यांत रेखा स्पोर्टस् मीडिया संघाने उमर स्पोर्ट्स, नेरूळ या संघाचा 10 विकेट्स राखून धुव्वा उडवला. भोसले क्रिकेट अकादमी संघाने रायझिंग स्टार संघाला 8 विकेट्स राखून हरवले. चनावला स्पोर्ट्स अकादमीने नवयुग संघाचे कठीण असे आव्हान मोडून काढत रवीकुमार चौधरी याच्या अष्टपैलू खेळीमुळे 7 विकेटने विजय मिळविला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा