भारत वि. वेस्ट इंडिज: वानखेडेची मॅच ब्रेबाॅर्नवर का हलवली? 'एमसीए'ची उच्च न्यायालयात धाव


SHARE

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होणारी चौथी वन-डे मॅच मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार होती. मात्र ही मॅच 'बीसीसीआय'च्या क्रिकेट प्रशासकीय समितीने ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवली. प्रशासकीय समितीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने बीसीसीआयला आठवड्याभरात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.


कधी होणार मॅच?

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या निर्देशानुसार २९ ऑक्टोबरला होणारी वन डे मॅच 'एमसीए'च्या वानखेडे स्टेडियम ऐवजी 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'च्या ब्रेबॉन स्टेडियमवर हलवण्यात आली आहे.


विश्वासात न घेताच निर्णय

मात्र, बीसीसीआयने 'एमसीए'ला विश्वासात न घेताच हा निर्णय घेतल्याचा आरोप 'एमसीए'ने केला आहे. यावर उच्च न्यायानयानं बीसीसीआयला आठवड्याभरात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.हेही वाचा-

नाराज 'एमसीआय' 'बीसीसीआय'विरोधात कोर्टात जाणार?

वेस्ट इंडिज सीरिज: चौथी 'वन डे' वानखेडेऐवजी ब्रेबाॅर्नवर!संबंधित विषय
ताज्या बातम्या