Advertisement

IPL 2020: Mid Season Transfer जाणून घ्या आयपीएलमधील नवा नियम

यंदाच्या आयपीएलध्ये एका नवा नियम लागू करण्यात आला आहे.

IPL 2020: Mid Season Transfer जाणून घ्या आयपीएलमधील नवा नियम
SHARES

दरवर्षी इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (आयपीएल) (indian premier league) नवीन नियम लागू करण्यात येतात. त्यानुसार यंदाच्या आयपीएलध्ये एका नवा नियम लागू करण्यात आला आहे. यंदा आयपीएलचं १३वं पर्व असून, या पर्वात प्रत्येक फ्रँचायझींना पहिल्या हाफनंतर संघात बदल करण्याची संधी मिळणार आहे. ७ सामन्यानंतर संघांना त्यांच्या कामगिरीचे परिक्षण करून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यासाठी रनणीती आखावी लागणार आहे.

बीसीसीआयनं (bcci) त्यासाठी मीड सेशन ट्रान्सफर विंडो (Mid Season Transfer) ही संकल्पना आणली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक संघाला आपली कमकुवत बाब भरून काढण्यासाठी प्रयत्न करता येणार आहे. येत्या १३ ऑक्टोबर रोजी सर्व संघांचे प्रत्येकी ७ सामने पूर्ण होणार असून, त्यावेळी ट्रान्सफरला सुरुवात होणार आहे.

आयपीएल मीड सेशन ट्रान्सफर विंडो

बीसीसीआयनं यंदाच्या हंगाम्यापासून आयपीएलमधील फ्रँचायझींना अन्य संघांकडून खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुभा दिली आहे. मागील हंगाम्यात ही संधी केवळ अन कॅप म्हणजेच राष्ट्रीय संघांकडून न खेळलेल्या खेळाडूंपुरती मर्यादित होती. परंतु, आता राष्ट्रीय खेळाडूंचीही अदलाबदल शक्य आहे.

'हे' आहेत नियम 

  • लीगच्या मध्यंतरापर्यंत खेळाडूनं २पेक्षा अधिक सामने खेळलेले नसावेत. 
  • लीगच्या मध्यंतरानंतरच ही अदलाबदल करता येणार आहे. 
  • प्रत्येक संघानं प्रत्येकी ७ सामने खेळणे आवश्यक आहेत.
  • २पेक्षा कमी सामने खेळलेल्या खेळाडूंची अदलाबदल करता येईल.
  • अदलाबदल करताना खेळाडूला देण्यात येणारी रक्कम फ्रँचायझीच्या पर्समधून वजा होणार नाही.
  • Mid Season Transfer मध्ये खेळाडूची देवाणघेवाण करण्यासाठी लागणारे पैसे हे ऑक्शन पर्सबाहेरुन द्यावे लागतील.
  • दोन्ही संघांचं एकमत आणि खेळाडूची समहती मिळणं गरजेचं आहे.
  • या प्रक्रियेत खेळाडूला त्याची लिलावात ठरवली गेलेली रक्कम मिळेल.
  • याव्यतिरीक्त त्याला कोणताही फायदा होणार नाही.



हेही वाचा -

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा