Ind vs SA: अखेरच्या कसोटी सामन्यात धोनी लावणार हजेरी


SHARE

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच भारतीय संघानं २-० नं आघाडी घेतली आहे. तिसरा कसोटी सामना १९ ऑक्टोबर रोजी रांची इथं होणार आहे. या सामन्यावेळी मैदानात महेंद्रसिंह धोनी हजेरी लावणार आहे.


कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. मात्र, झारखंड क्रिकेट असोसिएशननं धोनीला सामन्यासाठी हजर राहण्याची विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीला मान देत धोनीनं होकार कळवला आहे. त्यामुळं कसोटी सामन्यात प्रेक्षकांची संख्या अधिक वाढणार असल्याचा विश्वास सामना आयोजकांनी व्यक्त केला आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशननं, केंद्रीय राखीव पोलिस दल, लष्कर आणि पोलिस दलातील अधिकाऱ्यांसाठी ५ हजार मोफत तिकीटं राखीव ठेवली आहेत.


२ सामन्यात विजयी

कसोटी मालिकेतील २ सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवला आहे. त्यामुळं शेवटच्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

'पीएमसी'बाबत मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी

निवडणूक जाहिराती बेस्ट उपक्रमासाठी फायदेशीरसंबंधित विषय
ताज्या बातम्या