Advertisement

मुंबईच्या जेमिमा राॅड्रिग्सची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड


मुंबईच्या जेमिमा राॅड्रिग्सची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड
SHARES

भारतीय महिला क्रिकेट संघ अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यात ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात मुंबईच्या जेमिमा राॅड्रिग्सची निवड करण्यात अाली अाहे. त्याचबरोबर या दौऱ्यात भारतीय संघ पाच टी-२० सामन्यांची मालिकाही खेळणार अाहे. भारताच्या महिला संघाचं नेतृत्व मिताली राज हिच्याकडे तर उपकर्णधारपद हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात अालं अाहे. जेमिमासह मुंबईची पूनम राऊतचाही या संघात समावेश अाहे.


राज्यस्तरीय स्पर्धेत खेळलीय हाॅकी

सुरुवातीला भांडूप इथं राहणारं राॅड्रिग्स कुटुंबीय जेमिमाच्या करिअरसाठी वांद्रे इथं स्थलांतरित झालं. सुरुवातीला ती राज्यस्तरीय हाॅकी स्पर्धेत अाघाडीवीर म्हणून हाॅकीही खेळली अाहे. हाॅकी अाणि क्रिकेट या दोन्ही खेळांची मुशाफिरी करणाऱ्या जेमिमानं नंतर एमसीएकडून मिळणारा पाठिंबा अाणि शिस्तबद्ध खेळ म्हणून अोळखल्या जाणाऱ्या क्रिकेटची निवड केली. हाॅकीमध्ये केलेला धावण्याचा सराव तिला अाता फारच उपयोगी पडत अाहे.


द्विशतक झळकावल्यामुळे झाली लोकप्रिय

स्थानिक १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये १००० पेक्षा जास्त धावा पटकावणारी जेमिमा ही पहिली खेळाडू ठरली अाहे. १९ वर्षांखालील वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी जेमिमा ही भारतातील दुसरी महिला फलंदाज ठरली अाहे. याअाधी स्मृती मनधानाने हा पराक्रम केला होता. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात खेळताना मुंबईच्या जेमिमाने ही किमया साकारली होती. रोहित शर्माला ती अापला अादर्श मानते.


भारताचा महिला संघ -

मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, सुषमा वर्मा, एकता बिश्त, स्मृती मनधाना, पूनम यादव, पूनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, जेमिमा राॅड्रिग्स, झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, मोना मेश्राम, पूजा वस्त्रकार, वेदा कृष्णमूर्ती, तानया भाटिया.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा