Advertisement

मुंबई इंडियन्सची दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध अग्निपरीक्षा!


मुंबई इंडियन्सची दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध अग्निपरीक्षा!
SHARES

सुरुवातीच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सनं अायपीएलमध्ये जोमानं कमबॅक केलं अाहे. अाता रविवारी दुपारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध रंगणाऱ्या अायपीएलमधील अखेरच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सची कसोटी लागणार अाहे. प्ले-अाॅफ फेरीत मजल मारण्यासाठी मुंबईला हा सामना मोठ्या फरकानं जिंकावा लागणार अाहे.


कोणते संघ प्ले-अाॅफच्या शर्यतीत?

अातापर्यंत सनरायझर्स हैदराबादनं १३ सामन्यांत १८ तर चेन्नई सुपर किंग्सनं १३ सामन्यात १६ गुण मिळवत गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर मजल मारत प्ले-अाॅफ फेरीतील अापलं स्थान निश्चित केलं अाहे. अाता कोलकाता १४ गुणांसह तिसऱ्या अाणि राजस्थान राॅयल्स चौथ्या स्थानी अाहे. मुंबई, बंगळुरू अाणि पंजाब हे १२ गुणांसह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या अाणि सातव्या स्थानी अाहेत.


कोणाला किती संधी?

मुंबईने मोठ्या फरकानं दिल्लीवर विजय मिळवला तर ते तिसऱ्या स्थानी झेप घेतील. जर सनरायझर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता पराभूत झाला तर त्यांचे १४ गुणच राहतील अाणि शेवटच्या दोन जागांसाठी अाणखी दोन संघांना संधी मिळेल. जर कोलकाता जिंकला तर त्यांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित होईल. बंगळुरूवर विजय मिळवून राजस्थानचे १४ गुण झाले अाहेत. चेन्नईवर विजय मिळविण्यात पंजाब यशस्वी ठरला तर त्यांचेही १४ गुण होतील. याचा अर्थ, मुंबई, पंजाब, राजस्थान, कोलकाता (हरला तरच) यांच्यातील सरासरीच्या अाधारावर प्ले-अाॅफ फेरीतील दोन संघ ठरतील.


रोहित शर्माची खराब कामगिरी

कर्णधार रोहित शर्माची असातत्यपूर्ण कामगिरी ही मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरत अाहे. त्याला अातापर्यंत २७३ धावाच करता अाल्या अाहेत. गेल्या सामन्यात किराॅन पोलार्ड चमकला. सूर्यकुमार यादव (५०० धावा) हा एकमेव फलंदाज मुंबईच्या विजयात योगदान देत अाहे. सलामीवीर इर्विन लुइसही (३३४ धावा) त्याला चांगली साथ देत अाहे. अाता कृणाल-हार्दिक या पंड्या बंधूंना मोलाची कामगिरी निभावावी लागणार अाहे.


दिल्लीसाठी सराव सामना

दिल्लीचं अायपीएलमधील अाव्हान संपुष्टात अाल्यामुळे त्यांच्यासाठी मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना म्हणजे सराव सामनाच असेल. गौतम गंभीरचा कर्णधारपदाचा राजीनामा, श्रेयस अय्यरनं स्वीकारलेली सूत्रे, यामुळे दिल्लीला मोठी झेप घेता अालीच नाही. मात्र मुंबईकर पृथ्वी शाॅ अाणि श्रेयस यांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष राहील.


हेही वाचा -

मुंबईची पंजाब मोहिम फत्ते, बाद फेरीच्या आशा अद्याप जिवंत

इशान किशनने वाजवली कोलकाताची ‘पुंगी’, मुंबई इंडियन्सचा १०२ धावांनी विजय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा