Advertisement

मुंबई इंडियन्सला विजयी सूर गवसेल का?


मुंबई इंडियन्सला विजयी सूर गवसेल का?
SHARES

गतविजेत्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या अायपीएलमध्ये पहिल्या विजयासाठी अक्षरश: झुंजावे लागत अाहे. सलग तीन सामन्यांत पराभव पत्करल्यानंतर अाता वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजयी सूर गवसेल का? हाच एकमेव प्रश्न मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना पडला अाहे.


मुंबई इंडियन्सची फलंदाजी फ्लाॅप

मुंबई इंडियन्सची फलंदाजी पहिल्या दोन सामन्यांत फ्लाॅप ठरली होती. मुंबईकर सूर्यकुमार यादवला फलंदाजीत बढती देण्याचा निर्णय यशस्वी ठरला असला तरी कर्णधार रोहित शर्माला धावांचे योगदान द्यावे लागणार अाहे. हार्दिक अाणि कृणाल हे पंड्याबंधू तसेच वेस्ट इंडिजचा किराॅन पोलार्ड अद्याप अापला प्रभाव पाडू शकले नाहीत.


मयांक मार्कंडे ठरतोय प्रभावी

यंदाच्या अायपीएलमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय ते मुंबई इंडियन्सचा लेगस्पिनर मयांक मार्कंडे यानं. मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेला मयांकचा इकाॅनाॅमी रेटही चांगला अाहे. मुस्तफिझुर रहमान हा त्याला चांगली साथ देत असला तरी जसप्रीत बुमराला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता अालेली नाही.


विराट फाॅर्मात अाला

एक विजय अाणि दोन पराभव पचवणाऱ्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूलाही अद्याप म्हणावी तशी चांगली कामगिरी करता अालेली नाही. मात्र कर्णधार विराट कोहली फाॅर्मात अाला, ही बंगळुरूसाठी चांगली बाब म्हणावी लागेल. कोहली, एबी डीव्हिलियर्स, ब्रेंडन मॅककलम अाणि क्विंटन डीकाॅक यांच्यासारखे धोकादायक फलंदाज बंगळुरूकडे अाहेत, याची जाणीव मुंबईच्या गोलंदाजांना ठेवावी लागेल.


हेही वाचा -

मुंबई इंडियन्स संघात अॅडम मिलनेची एंट्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा