Advertisement

मुंबई इंडियन्स संघात अॅडम मिलनेची एंट्री


मुंबई इंडियन्स संघात अॅडम मिलनेची एंट्री
SHARES

एकीकडे मुंबई इंडियन्सची पराभवांची मालिका संपता संपत नाहीये अाणि एकापाठोपाठ खेळाडूंच्या तक्रारी समोर येत अाहेत. अाॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने अायपीएलमधून माघार घेतली असून त्याच्या जागी अाता न्यूझीलंडच्या अॅडम मिलनेची निवड करण्यात अाली अाहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना मंगळवारी राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूशी वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून लवकरच अॅडम मिलने मुंबई संघात सामील होणार अाहे.


७५ लाखांची बेस प्राइस

जानेवारी महिन्यात झालेल्या अायपीएलच्या लिलावात अॅडम मिलनेसाठी ७५ लाख रुपयांची बेस प्राइस ठेवण्यात अाली होती. पण त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. गेल्या दोन मोसमात तो बंगळुरूतर्फे खेळला होता. अाता मुंबईकडून त्याचा जलवा पाहायला मिळणार अाहे.


मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात

गतविजेत्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या अायपीएलमध्ये अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता अालेला नाही. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबादनंतर अाता दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे मुंबईची गुणतालिकेत तळाच्या स्थानी घसरण झाली अाहे.


हेही वाचा -

मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव; रोहित शर्माचा बॅड पॅच सुरूच!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा