Advertisement

IPL 2021: मुंबई इंडियन्स परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार मायदेशी

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या कोरोनामुळं आता आयपीएलवर ही परिणाम झाला आहे. आयपीएल स्पर्धा खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण होत आहे.

IPL 2021: मुंबई इंडियन्स परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार मायदेशी
SHARES

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या कोरोनामुळं आता आयपीएलवर ही परिणाम झाला आहे. आयपीएल स्पर्धा खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळं  बीसीसीआयला अखेर स्पर्धेला स्थगिती देण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र, आयपीएल पुन्हा कधी आणि कुठे खेळवायचं याचा निर्णय नंतर परिस्थितीनुसार घेतला जाईल असं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं. आयपीएल स्थगित झाल्यानं खेळाडू आपापल्या घऱी जाण्यासाठी निघाले आहेत. यावेळी अनेक परदेशी खेळाडूंना निर्बंधांमुळे मायदेशी जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने परदेशी खेळाडू सुखरुप मायदेशी पोहोचावेत यासाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली आहे.

मुंबई इंडियन्स आपल्या संघातील परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानानं पाठवणार आहे. ही विमानं दक्षिण आफ्रिकामार्गे न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजसाठी उड्डाण करतील. मुंबई इंडियन्स संघात ट्रेंट बोल्ट, अडम मिलने, जेम्स नीशम, शेन बाँड अशा न्यूझीलंडमधील अनेक खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने इतर संघातील परदेशी खेळाडूंनाही सोबत येण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.

एक विमान पोलार्ड राहत असलेल्या त्रिनिदादसाठी उड्डाण करणार आहे. हे विमान दक्षिण आफ्रिका मार्गे वेस्ट इंडिजला जाणार आहे. क्विंटन डी कॉक आणि मॅक्रो जेनसनसहित दक्षिण आफ्रिकाचे अनेक खेळाडू यावेळी आपल्या मायदेशात पोहोचतील. हे विमान २४ तासांत निघणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा