Advertisement

क्विंटन डिकॉकची अर्धशतकी खेळी; मुंबईचा दणदणीत विजय


क्विंटन डिकॉकची अर्धशतकी खेळी; मुंबईचा दणदणीत विजय
SHARES

मुंबई इंडियन्सने केकेआर विरुद्धच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून केकेआरनं प्रथम फलंदाजी करत मुंबईपुढे विजयासाठी १४९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या क्विंटन डीकॉकने यावेळी दमदार अर्धशतक झळकावले. डीकॉकच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने केकेआरवर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. डीकॉकने यावेळी ४४ चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर नाबाद ७८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

केकेआरच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि डीकॉक यांनी केकेआरच्या गोलंदाजांचा यावेळी चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी मुंबईला ९४ धावांची सलामी दिली. डीकॉकच्या यामध्ये अर्धशतकी वाटा होता. मात्र, रोहित शर्माला अर्धशतक करता आलं नाही. 

रोहित बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवला यावेळी जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. यादवला यावेळी १० धावांवर समाधान मानावे लागले. यादव बाद झाल्यावर फलंदाजी करायला हार्दिक पंड्या मैदानात आला. डीकॉक आणि पंड्या या जोडीने यावेळी मुंबईला विजय मिळवून दिला.

केकेआरला या सामन्यात १४८ धावांवर समाधान मानावं लागलं. या सामन्यात केकेआरची मुंबईनं ५ बाद ६१ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर पॅट कमिन्स आणि कर्णधार इऑन मॉर्गन यांची चांगलीच जोडी जमलेली पाहायला मिळाली. या दोघांनी मिळून ६ व्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. मुंबईचा वेगवान गोलंदाज बोल्टनं केकेआरला पहिला धक्का दिला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा